IND vs WI : वेस्ट इंडिज दौऱ्यात विराट कोहली तीन विक्रम करणार नावावर, कोणते ते वाचा

| Updated on: Jul 10, 2023 | 6:34 PM

रनमशिन म्हणून ख्याती असलेल्या विराट कोहलीला वेस्ट इंडिज दौऱ्यात तीन विक्रम मोडण्याची नामी संधी आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यात टीम इंडिया 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 टी 20 मालिका खेळणार आहे. या दौऱ्यात विराट कोहली कसोटी आणि वनडे संघात आहे.

1 / 6
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 स्पर्धेची सुरुवात टीम इंडिया वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेतून करणार आहे. 12 जुलैपासून पहिला कसोटी सामना होणार आहे. ही कसोटी मालिका जिंकल्यास वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा मार्ग सुकर होणार आहे.

2 / 6
वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत विराट कोहलीच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. विराट कोहली कसोटी आणि वनडे संघाचा भाग आहे. तसेच फॉर्ममध्ये असल्याने त्याच्याकडून क्रीडाप्रेमींना अपेक्षा आहेत.

3 / 6
विराट कोहली फॉर्ममध्ये असल्याने वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत तीन विक्रम मोडू शकतो. हे विक्रम मोडणं विराट कोहलीला सोपं असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.

4 / 6
विराट कोहली वेस्ट इंडिज विरुद्ध सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरू शकतो. वेस्ट इंडिज विरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा मान दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसच्या नावावर आहे. त्याने एकूण 4120 धावा केल्या आहे. दुसरीकडे, विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध तिन्ही फॉर्मेटमध्ये 3653 धावा केल्या आहे. त्यामुळे हा विक्रम मोडण्यासाठी 467 धावांची आवश्यकता आहे.

5 / 6
वेस्ट इंडिजमध्ये विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपली आहे. कॅरेबियन बेटावर विराट कोहलीने 50.56 च्या सरासरीने 1365 धावा केल्या आहेत. सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांच्यात धरतीवर सर्वाधिक धावा करण्याचा मान राहुल द्रविडच्या नावर आहे. त्याने कॅरेबियन बेटावर एकूण 1838 धावा केल्या आहेत. हा विक्रम मोडण्यासाठी कसोटी आणि वनडे मालिकेत एकूण 473 धावांची गरज आहे.

6 / 6
विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध सर्व फॉर्मेटमध्ये एकूण 11 शतकं ठोकली आहेत. या यादीत विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर येतो. सुनील गावसकर यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक 13 शतकं ठोकली आहे. तर सध्या दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या एबी डिव्हिलियर्स आणि विराट 11 शतकांसह बरोबरीत आहेत. त्यामुळे शतकांचा विक्रम मोडण्यासाठी 3 शतकांची आवश्यकता आहे.