IND vs WI : विराट कोहली याने वीरेंद्र सेहवागला टाकलं मागे, 25 धावा करताच नोंदवला असा विक्रम
IND vs WI: वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात विराट कोहली खेळपट्टीवर संघर्ष करताना दिसला. एका चौकारासाठी त्याला 80 चेंडूंचा सामना करावा लागला. या संघर्षात विराट कोहलीने दुसऱ्या दिवशी नाबाद 36 धावा केल्या आणि वीरेंद्र सेहवागचा विक्रम मोडला.
1 / 5
भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. पहिल्या कसोटी सामन्यावर भारताने मजबूत पकड मिळवली आहे. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालच्या शतकामुळे वेस्ट इंडिज पिछाडीवर गेली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताकडे 162 धावांची आघाडी आहे.
2 / 5
रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांच्या शतकांनंतर आता विराटच्या कामगिरीकडे लक्ष लागून आहे. कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. असं असताना दुसऱ्या दिवसाच्या खेळात नाबाद 36 धावा करणाऱ्या कोहलीने वीरेंद्र सेहवागचा विक्रम मोडीत काढला आहे.
3 / 5
यशस्वी जयस्वालसोबत अर्धशतकी भागीदारी करत विराट कोहलीने खेळपट्टीवर संयम दाखवला. 80 चेंडू खेळल्यानंतर चौकार मारला. इतकी संयमी खेळी विराट कोहलीने केली.
4 / 5
सामन्यात विराट कोहलीने 21 धावा पूर्ण करताच कसोटी क्रिकेटमध्ये 8500 धावा पूर्ण केल्या. तसेच 25 धावा करताच त्याने वीरेंद्र सेहवागला मागे टाकलं. सेहवागने कसोटी क्रिकेटमध्ये 8503 धावा केल्या आहेत. आता कोहलीने भारतासाठी सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पाचवे स्थान पटकावले आहे.
5 / 5
तीन वर्षांपासून मोठ्या खेळीसाठी झगडणाऱ्या कोहलीकडून अपेक्षा आहेत. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा त्याने 36 धावा केल्या होत्य.