IND vs WI : टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी विंडिज संघाची घोषणा, वजनदार खेळाडूला मिळाली संधी

| Updated on: Jul 08, 2023 | 5:38 PM

भारत विरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी वेस्ट इंडिज संघाची घोषणा करण्यात आली आहे. यात दोन अनकॅप्ड खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

1 / 7
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिला कसोटी सामना 12 जुलैपासून डोमिनिका पार्क येथे सुरु होणार आहे. त्यानंतर दुसरा कसोटी सामना 20 जुलैपासून त्रिनिदादच्या क्विंस पार्क ओव्हलमध्ये असेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीकोनातून ही मालिका महत्त्वाची आहे.

2 / 7
वेस्ट इंडिज संघात प्रथमच कर्क मॅकेन्झी आणि अलिक अथानाजे या अनकॅप्ड खेळाडूंची निवड झाली आहे. वेस्ट इंडिजने वेगवान गोलंदाज जेडन सील्स आणि अष्टपैलू कायल मेयर्स या दोघांना बाहेर बसवलं आहे. तर क्रेग ब्रेथवेट यांच्याकडे पुन्हा एकदा नेतृत्व सोपण्यात आलं आहे.

3 / 7
नोव्हेंबर 2021 पासून एकही कसोटी सामना न खेळलेला अष्टपैलू रहकीम कॉर्नवॉल आणि फेब्रुवारीच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून बाहेर पडलेला डावखुरा फिरकी गोलंदाज जोमेल वॅरिकन यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे.

4 / 7
रहकीमने 9 कसोटी सामन्यात 34 गडी बाद केले आहेत. तसेच 238 धावा केल्या आहेत. रहकीम कॉर्नवालच वजन 140 किलो आहे.

5 / 7
निवड समितीचे अध्यक्ष डेसमंड हेन्स यांनी सांगितलं की, "आम्ही बांगलादेश 'अ' संघाविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्यात मॅकेन्झी आणि अथानाजे यांच्या फलंदाजीने खूप प्रभावित झालो. या दोन युवा खेळाडूंना संधी दिली आहे."

6 / 7
वेस्ट इंडिजचा संघ त्यांच्या प्री-सीरिज सराव शिबिरानंतर 9 जुलै रोजी अँटिग्वाच्या कूलिज क्रिकेट ग्राउंडवरून डॉमिनिकाला रवाना होईल.

7 / 7
वेस्ट इंडिजचा कसोटी संघ : क्रेग ब्रॅथवेट (कर्णदार), जर्मेन ब्लॅकवुड (उपकर्णधार), एलिक अथानाजे, टेगेनरीन चंद्रपॉल, रहकीम कॉर्नवॉल, जोशुआ दा सिल्वा, शॅनन गॅब्रियल, जेसन होल्डर, अल्जारी जोसेफ, किर्क मॅकेंजी, रेमन रीफर, केमार रोच, जोमेल वॉरिकन  राखीव खेळाडू: टेविन इमलाच, अकीम जॉर्डन