यशस्वी जयस्वाल पदार्पणाच्या सामन्यात 150 धावा करणारा तरुण भारतीय खेळाडू ठरला.
यशस्वी जयस्वाल याने वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात 171 धावांची खेळी केली. ही कामगिरी करताना यशस्वी जयस्वाल याचं वय 21 वर्षे आणि 196 दिवस इतकं आहे.
पाकिस्तानच्या जावेद मियादाद यांनी 19 वर्षे आणि 119 दिवसांचे असताना न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात 150 हून अधिक धावा केल्या होत्या. 1976 साली हा सामना झाला होता. (Twitter)
ऑस्ट्रेलियाच्या अर्ची जॅकसन यांनी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात 150 हून अधिक धावा केल्या होत्या. तेव्हा त्यांचं वय 19 वर्षे 149 दिवस होतं. 1929 साली हा सामना झाला होता. (ICC Twitter)
ऑस्ट्रेलियाच्या डॉज वॉल्टरने 1965 साली पदार्पणाच्या सामन्यात 150 धावा केल्या होत्या. इंग्लंडविरुद्ध त्यांनी ही कामगिरी केली होती. तेव्हा ते 19 वर्षे आणि 354 दिवसांचे होते. (ICC Twitter)
वेस्ट इंजिच्या जॉर्ज हेडली यांनी 1930 साली पदार्पणाच्या सामन्यात 150 धावांची खेळी केली होती. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात त्यांनी ही कामगिरी केली होती. त्यांचं वय 20 वर्षे आणि 226 दिवस होतं. (ICC Twitter)