IND vs WI: टीम इंडियात निवड झाल्यानंतर वडिलांनी दिली अशी प्रतिक्रिया, यशस्वी जयस्वाल याने सांगितलं काय झालं?

| Updated on: Jun 24, 2023 | 5:16 PM

देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या यशस्वी जयस्वालची टीम इंडियामध्ये निवड झाली आहे. संघात निवड झाल्यानंतर त्याने आनंद व्यक्त केला आहे. दुसरीकडे, वडिलांच्या प्रतिक्रियेबाबतही सांगितलं आहे.

1 / 7
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत यशस्वी जयस्वालची राखीव खेळाडू म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र संघात कधी स्थान मिळणार याबाबत धाकधूक होती. अखेर त्याची वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी संघात निवड करण्यात आली आहे. सामन्यात तो तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसू शकतो.

2 / 7
बीसीसीआयने वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी संघात यशस्वी जयस्वालची निवड केली आहे. चेतेश्वर पुजाराच्या रिक्त जागी यशस्वी मैदानात दिसण्याची शक्यता आहे.

3 / 7
टीम इंडियात टॉप पाच फलंदाज राईट हँडेड असून लेफ्ट हँडेड फलंदाजाची संघाला गरज होती. त्यामुळे यशस्वी जयस्वालला संधी मिळू शकते. यशस्वीने कसोटीत चमकदार कामगिरी केली तर त्याला भविष्यात पुढे जाण्याची खूप मोठी संधी आहे.

4 / 7
भारतीय संघात निवड झाल्यानंतर यशस्वीने सांगितलं की, "जेव्हा माझ्या वडिलांना ही बातमी कळली तेव्हा ते रडू लागले. सध्या मी सरावात व्यस्त असून घरी गेलो नाही. घरी गेल्यावर आई कशी प्रतिक्रिया देतील याची उत्सुकता आहे."

5 / 7
जयस्वालने वेस्ट इंडिज दौऱ्याच्या तयारीबाबत सांगितले की, "मी बंगळुरु येथील एनसीएमध्ये प्रशिक्षणासाठी जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी सराव करताना मला वरिष्ठ खेळाडूंची साथ लाभली. हा सराव माझ्यासाठी फायदेशीर ठरला."

6 / 7
"वरिष्ठ खेळाडूंकडून खूप काही शिकायला मिळाले. मला संघात संधी मिळाली तर मी सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेल. जो काही विचार केला आहे ते नक्कीच साध्य करेन. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी संघ जाहीर होण्यापूर्वी धाकधूक होती. पण निवड झाल्याने आनंद झाला आहे.", असंही त्याने पुढे सांगितलं.

7 / 7
आयपीएल 2023 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना यशस्वी जयस्वालने 163.61 च्या स्ट्राईक रेटने 625 धावा केल्या. तसेच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळताना 15 सामन्यात 80.21 च्या सरासरीने 9 शतकांसह 845 धावा केल्या आहेत.