वनडेत पाकिस्तानच्या सैम अयूबच्या नावावर नवा विक्रम, अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज

| Updated on: Nov 26, 2024 | 8:43 PM

पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. पहिल्या वनडे सामन्यात झिम्बाब्वेने 80 धावांनी विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने कमबॅक केलं आहे. तसेच 10 राखून विजय मिळवला. यात सईम अयुबच्या नावावर एका विक्रमाची नोंद झाली आहे.

1 / 5
पाकिस्तानने दुसऱ्या वनडे सामन्यात झिम्बाब्वेला 10 विकेट राखून पराभूत केलं. झिम्बाब्वेने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेला 32.3 षटकात सर्व गडी गमवून 145 धावा करता आल्या. हे आव्हान पाकिस्तानने 18.2 षटकात एकही गडी न गमावता पूर्ण केलं.

2 / 5
पाकिस्तानने हे आव्हान सैम अयुबच्या वादळी शतकाच्या जोरावर पूर्ण केलं. अयुबशिवाय या विजयात अब्दुला शफीकचं 32 धावांचं योगदान राहिलं.  या दोघांच्या खेळीमुळे तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-1 बरोबरी केली आहे.

3 / 5
सैम अयुबने 53 चेंडूत शतक पूर्ण केलं. त्याचं वनडे कारकिर्दितील हे पहिलंच शतक आहे. अयुबने 62 चेंडूत नाबाद 113 धावा केल्या. यात 17 चौकार आणि तीन षटकार मारले.

4 / 5
वनडे क्रिकेटमध्ये पाकिस्तानसाठी वेगाने शतक ठोकणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. शाहीद आफ्रिदीने श्रीलंकेविरुद्ध 37 चेंडूत, भारताविरुद्ध 45 चेंडूत आणि बांगलादेशविरुद्ध 53 चेंडूत शतक ठोकलं. सैम अयुबने 53 चेंडूत झिम्बाब्वेविरुद्ध शतक ठोकलं. तर शरजील खानने आयर्लंडविरुद्ध 61 चेंडूत शतक ठोकलं.

5 / 5
वनडे क्रिकेटमध्ये 150 पेक्षा कमी धावांचं टार्गेट असताना शतक ठोकणारा पहिला फलंदाज ठरला आहे. अशी कामगिरी यापूर्वी कोणत्याच फलंदाजाने केलेली नाही. विजयासाठी 145 धावा असताना 113 धावा एकट्या सैमच्या आहेत. (सर्व फोटो- X.com)