IND vs ZIM : टीम इंडियाच्या पराभवासाठी आयपीएलचे पाच सुपरस्टार ठरले कारणीभूत! जाणून घ्या काय केलं ते
सात दिवसांपूर्वी टीम इंडियाने टी20 वर्ल्डकप जेतेपदावर नाव कोरलं. आज खेळाडू जरी वेगळे असले तरी पराभवाची नामुष्की ओढावली आहे. आयपीएलमध्ये एक हाती सामना फिरवणारे खेळाडू सपशेल फेल ठरले. आयपीएलच्या कामगिरीवर टीम इंडियात निवड करणं आता घाईचं ठरू शकतं असं वाटत आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात याची प्रचिती आली.
1 / 7
2 / 7
आयपीएलच्या पाच सुपरस्टार्सच्या खराब कामगिरीमुळे टीम इंडियावर पराभवाची नामुष्की ओढावली. त्यांच्याकडून 115 धावांचं आव्हान सहज गाठलं जाईल असं वाटत होतं. पण आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय सामन्यातील फरक दिसून आला. शुबमन गिल आणि वॉशिंग्टन सुंदर वगळता एकही खेळाडू तग धरू शकला नाही.
3 / 7
टीम इंडियाला आयपीएल स्टार फलंदाज अभिषेक शर्माकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र सलामीवीर म्हणून आलेला अभिषेक शर्मा फेल ठरला. इतकंच काय तर पदार्पणाच्या सामन्यात खातंही उघडता आलं नाही. अभिषेकने 4 चेंडूंचा सामना केला आणि विकेट देऊन तंबूत परतला.
4 / 7
अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर भारतीय संघाला अनुभवी फलंदाज ऋतुराज गायकवाडकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण झिम्बाब्वेच्या गोलंदाजांसमोर ऋतुराज तग धरू शकला नाही. ऋतुराजने 9 चेंडूत फक्त 1 चौकार मारला आणि बाद झाला.
5 / 7
आयपीएलमध्ये आक्रमक खेळी करणाऱ्या रियान परागकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती. पण तसं काहीच घडलं नाही. परागला 3 चेंडूत फक्त 2 धावा करता आल्या. तेंडाईच्या गोलंदाजीवर बाद झाला.
6 / 7
पराभवाच्या जबड्यातून विजय खेचून आणतो अशी रिंकु सिंहची आयपीएलमध्ये ओळख आहे. पण आंतरराष्ट्रीय पातळीवर तसं यश मिळताना दिसता नाही. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. खराब फटका मारून तंबूत परतला.
7 / 7
आयपीएलमध्ये ध्रुव जुरेलने जबरदस्त कामगिरी केली होती. त्यामुळे त्याच्या फलंदाजीचं सर्वत्र कौतुक होत होतं. पण त्याची बॅटही चालली नाही. 14 चेंडूत 6 धावा करून बाद झाला.