IND vs ZIM : रिंकु सिंहने शेवटच्या दोन षटकात मोडला सूर्यकुमार यादवचा विक्रम, काय ते जाणून घ्या
झिम्बाब्वे विरूद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात रिंकु सिंह फेल गेला होता. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. मात्र दुसऱ्या सामन्यात त्याने याची उणीव भरून काढली. तसेच शेवटच्या दोन षटकात सूर्यकुमार यादवचा विक्रमही मोडीत काढला.
1 / 6
झिम्बाब्वे विरुद्धचा दुसरा टी20 सामना जिंकत भारताने मालिकेत कमबॅक केलं आहे. झिम्बाब्वेला 100 धावांनी पराभूत करत पहिल्या सामन्यातील पराभवाचा वचपा काढला. तसेच मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आहे.
2 / 6
दुसऱ्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 234 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र झिम्बाब्वेचा संघ 134 धावा करू शकला आणि भारताने 100 धावांनी दणदणीत विजय मिळवला.भारताने शेवटच्या पाच षटकात म्हणजेच 30 चेंडूत 82 धावा केल्या.
3 / 6
भारताने दुसऱ्या टप्प्यातील 10 षटकात 160 धावा केल्या. इतक्या धावा करणारा भारत हा टी20 क्रिकेटमधील पहिला संघ ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम श्रीलंकेच्या नावावर होता. त्यांनी 2007 मध्ये केनियाविरुद्ध 159 धावा केल्या होत्या.
4 / 6
भारताकडून अभिषेक शर्माने 100 धावा,ऋतुराज गायकवाडने नाबाद 77 धावा आणि रिंकू सिंगने 48 धावांची नाबाद खेळी केली. रिंकूने 48 धावा करत सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडीत काढला.रिंकू सिंगने 22 चेंडूत 5 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 48 धावांची नाबाद खेळी खेळली.
5 / 6
रिंकु सिंहने 5 षटकारांच्या मदतीने रिंकूने सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला. रिंकु सिंहने सूर्याला मागे टाकत टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 19व्या आणि 20व्या षटकात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत चौथे स्थान पटकावले आहे.
6 / 6
भारतासाठी 19व्या आणि 20व्या षटकात 48 चेंडूंचा सामना करणाऱ्या रिंकू सिंहने टी20मध्ये एकूण 17 षटकार ठोकले. तर सूर्यकुमारने 62 चेंडूत 14 षटकार ठोकले.दिनेश कार्तिकनेही शेवटच्या दोन षटकात 97 चेंडूंचा सामना करत 14 षटकार ठोकलेत. शेवटच्या दोन षटकांत 193 चेंडूंचा सामना करणारा हार्दिक पांड्या एकूण 32 षटकारांसह अव्वल स्थानावर आहे.