IND vs ZIM : झिम्बाब्वेविरुद्ध पहिला टी20 सामना जिंकताच टीम इंडिया रचणार इतिहास, काय ते जाणून घ्या
टी20 वर्ल्डकप विजयानंतर टीम इंडियाचा पहिलाचा दौरा आहे. टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यात पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडिया ही मालिका खेळणार आहे. आता शुबमन गिलला पहिला सामना जिंकून विक्रम रचण्याची संधी आहे.
1 / 6
टीम इंडिया आता पाच सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. भविष्यातील टीमची बांधणी करण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. 2026 वर्ल्डकपसाठी आतापासून मोर्चेबांधणी केली जात आहे. दरम्यान झिम्बाब्वे दौऱ्याासठी शुबमन गिलकडे नेतृत्व सोपवलं असून पहिल्याच सामन्यात विश्वविक्रम रचण्याची संधी आहे.
2 / 6
शुबमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडियाने पहिला सामना जिंकला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका विक्रमाची नोंद होईल. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम प्रस्थापित होईल.
3 / 6
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम बर्म्युडाच्या नावावर आहे. बरमुडाने 2021 ते 2023 या कालावधीत सलग 13 सामने जिंकले होते. तर मलेशियाने 2022 मध्ये सलग 13 सामने जिंकले होते. पण हे दोन्ही देश कसोटी सामने खेळलेले नाहीत.
4 / 6
अफगाणिस्तानने 2018 ते 2021 पर्यंत सलग 12 टी20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. 2020 ते 2021 पर्यंत रोमानियाने सलग 12 टी20 सामने जिंकले.
5 / 6
टीम इंडियाने टी20 वर्ल्डकपमध्ये एकही सामना गमावेला नाही. टी20 वर्ल्डकपमध्ये सलग 8 सामने जिंकले. यापूर्वी अफगाणिस्तानविरुद्ध 3 सामन्यांनी मालिका जिंकली होती.
6 / 6
2021 ते 2022 पर्यंत टीम इंडियाने सलग 12 टी20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. यावेळीही टीम इंडियाने सलग 12 सामने जिंकले आहेत. आता भारताने आणखी एक सामना जिंकला तर तो टी20 मध्ये सर्वाधिक विजय मिळवणारा देश ठरेल. जर दोन सामने जिंकला तर बर्म्युडा आणि मलेशियालाही मागे टाकेल. भारताला 6 जूनला झिम्बाब्वेविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. दुसरा सामना 7 जून रोजी होणार आहे.