इंडिया ए ने एसीसी वूमन्स एमर्जिंग आशिया कप स्पर्धेतील अंतिम सामन्यात धडक मारली आहे. विशेष बाब म्हणजे टीम इंडिया फक्त एक मॅच जिंकून अंतिम फेरीत पोहचलीय.
आशिया कप स्पर्धेत पावसाने जोरदार बॅटिंग केलीय. टीम इंडियाने या स्पर्धेत फक्त हाँगकाँग विरुद्ध विजय मिळवला. त्यानंतर नेपाळ आणि पाकिस्तान विरुद्धच्या सामना हा पावसामुळे रद्द झाला.
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात सोमवारी सेमी फायनल मॅच खेळवण्यात येणार होता. मात्र पावसामुळे हा सामना राखीव दिवसापर्यंत गेला. मात्र राखीव दिवशीही पावसाने गेम केल्याने टीम इंडिया रनरेटच्या जोरावर फायनलमध्ये पोहचली.
एसीसी वूमन्स एमर्जिंग टीम आशिया कप स्पर्धेत आतापर्यंत एकूण 8 सामने पावसामुळे रद्द करावे लागले. इतकंच नाही, तर दुसऱ्या सेमी फायनल आणि फायनल सामन्यातही पाऊस पडणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दुसरा सेमी फायनल सामना हा बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान यांच्यात पार पडला. बांगलादेशने विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. हा महाअंतिम सामना 21 जून रोजी खेळवण्यात येणार आहे. या सामन्यावरही पावसाचं सावट आहे.