Asia Cup 2023 : भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज अंतिम फेरीची लढत, कोण मारणार बाजी?

| Updated on: Jun 01, 2023 | 2:17 PM

ज्युनिअर आशिया कप हॉकी 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. या सामन्याकडे क्रीडाप्रेमींच्या नजरा लागून आहेत.

1 / 7
ओमानमधील सलालाह स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे गुरुवारी (आज) पुरुषांच्या ज्युनियर आशिया चषक 2023 हॉकी फायनलमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान भिडणार आहेत. ही लढत रात्री 9:30 वाजता सुरू होईल आणि भारतात थेट प्रक्षेपित होईल.

2 / 7
स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी अपराजित राहून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. याआधी साखळी फेरीत दोन्ही संघ आमनेसामने आले होते आणि हा सामना 1-1 असा बरोबरीत सुटला होता. दुसरीकडे, पाकिस्तानपेक्षा जास्त गोल करत भारताने गटात अव्वल स्थान पटकावले आहे.

3 / 7
गतविजेत्या भारताने चीनवर 18-0 आणि जापानवर 3-1 असा विजय मिळवून आपल्या मोहिमेची सुरुवात केली. त्यानंतर गटातील थायलंडचा 17-0 असा पराभव केला. उपांत्य फेरीत कोरियन संघाचा 9-1 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली.

4 / 7
दुसरीकडे, पाकिस्तान हॉकी संघाने पहिल्या सामन्यात चीनचा 15-1 असा पराभव केला. पुढच्या सामन्यात थायलंडचा 9-0 असा पराभव केला आणि अंतिम साखळी सामन्यात जापानला 3-2 ने पराभूत केले. उपांत्य फेरीत मलेशियाचा 6-2 असा पराभव केल्यानंतर आता अंतिम फेरीत पाकिस्तानची लढत भारताशी होणार आहे.

5 / 7
अंतिम फेरीत पाकिस्तानच्या अब्दुल रहमान आणि भारताच्या अरिजीत सिंग हुंदल यांच्याकडे लक्ष असेल. रहमानने 9 गोलसह संयुक्तिकरित्या सर्वाधिक गोल केले आहेत. तर सात गोलसह हुंदल दुसऱ्या स्थानावर आहे.

6 / 7
भारत आणि पाकिस्तान याआधी तीन वेळा हॉकीच्या ज्युनियर आशिया कपच्या फायनलमध्ये आमनेसामने आले आहेत. पाकिस्तानने 1996 मध्ये फायनल जिंकली होती, तर 2004 मध्ये भारताने बाजी मारली होती.

7 / 7
2015 मध्ये मलेशियामध्ये झालेल्या आशिया कप स्पर्धेत भारताने अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते.