Icc World Cup 2023 | 1 ट्रॉफी, 3 सामने आणि 4 संघ, कोण जिंकणार वर्ल्ड कप?
Icc World Cup 2023 | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधून जोरदार रस्सीखेचनंतर अखेर सेमी फायनलसाठी 4 संघ निश्चित झाले. तर 6 संघांना गाशा गुंडाळून मायदेशी परतावं लागलं आहे.
1 / 5
आयसीसी वनडे वर्ल्ड कप इतिहासात मोठा योगायोग जुळून आला आहे. वर्ल्ड कपमध्ये 8 वर्षांनी हा योगायोग जुळलाय.
2 / 5
वर्ल्ड कप 2015 नंतर यंदा वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडिया, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 4 संघांनी सेमी फायनलमध्ये क्वालिफाय केलं आहे.
3 / 5
टीम इंडिया (1) विरुद्ध न्यूझीलंड (4) यांच्यात वर्ल्ड कप 2023 मधील पहिली सेमी फायनल होणार आहे. या सामन्याचं आयोजन हे 15 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.
4 / 5
तर दुसऱ्या सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया भिडणार आहेत. हा सामना 16 नोव्हेंबरला कोलकातामधील इडन गार्डनमध्ये होणार आहे.
5 / 5
तसेच या 13 व्या वर्ल्ड कपमधील महाअंतिम सामना हा रविवारी 19 नोव्हेंबरला होणार आहे. हा महामुकाबला जगातील सर्वात मोठं स्टेडियम असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे.