Rohit Sharma | रोहित शर्माचं झिरोवर आऊट होऊनही शतक, जाणून घ्या कसं?

| Updated on: Jan 12, 2024 | 6:59 PM

India vs Afghanistan 1st T20I | टीम इंडियाने अफगाणिस्तान विरुद्ध पहिला टी 20 सामना हा 6 विकेट्सने जिंकला. टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. कॅप्टन रोहित शर्मा या सामन्यात झिरोवर आऊट झाला. मात्र त्यानंतरही रोहितने खास शतक केलं.

1 / 6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा  11 जानेवारी रोजी अफगाणिस्तान विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात मोहालीत झिरोवर आऊट झाला.  सामन्यातील दुसऱ्या डावामधील दुसऱ्याच बॉलवर रोहित आऊट झाला. मात्र यानंतरही रोहितने खास शतक ठोकलं.

2 / 6
टीम इंडियाने टॉस जिंकून अफगाणिस्तानला बॅटिंगसाठी बोलावलं. अफगाणिस्तानने टीम इंडियाला 159 धावांचं आव्हान दिलं. टीम इंडियाने हे आव्हान  17.3 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून हे आव्हान पूर्ण केलं.

3 / 6
टीम इंडियासाठी ऑलराउंडर शिवम दुबे याने निर्णायक भूमिका बजावली. शिवमने आधी 9 धावांच्या मोबदल्यात 1 विकेट घेतली. तर त्यानंतर 40 बॉलमध्ये नाबाद 60 धावा केल्या. तर रिंकू सिंह याने 9 बॉलमध्ये 16 धावांची नाबाद खेळी केली.

4 / 6
अफगाणिस्तानचा माजी कर्णधार आणि ऑलराउंडर मोहम्मद नबी याने टीमसाठी सर्वाधिक धावा केल्या. नबीने 27 बॉलमध्ये  42 धावा केल्या.

5 / 6
टीम इंडियाकडून पहिल्या सामन्यात 6 जणांनी बॉलिंग केली.अक्षर पटेल आणि मुकेश कुमार या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर शिवम दुबे याने 1 विकेट घेतली. शिवमला ऑलराउंड कामगिरीसाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.

6 / 6
रोहितने या विजयासह खास शतक पूर्ण केलं. टीम इंडियाचा हा 100 वा टी 20 विजय ठरला. रोहित 100 सामने जिंकणाऱ्या संघाचा भाग राहिला आहे. म्हणजेच रोहितसोबत टीम इंडियाने 100 वा टी 20 विजय साजरा केला.