Asian Games : एशियन गेम्समध्ये भारताचं 72 वर्षातील सर्वोत्तम कामगिरी, वाचा काय ते
Asian Games 2023 : एशियन गेम्समध्ये भारताची कामगिरी सर्वोत्तम राहिली आहे. 72 वर्षातील इतिहासात भारताचं जबरदस्त प्रदर्शन आहे. आतापर्यंत एकूण 81 पदकांची कमाई केली आहे.
1 / 5
एशियन गेम्समध्ये भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरीचं प्रदर्शन केलं आहे. 11 व्या दिवशीही भारतीय खेळाडूंनी पदकांची कमाई केली. एशियन गेम्समध्ये 72 वर्षातील सर्वोत्तम कामगिरी आहे.
2 / 5
बुधवारी एकूण 12 मेडल भारताच्या खात्यात आले. यात 3 गोल्ड, 5 सिल्व्हर आणि 4 ब्राँझ मेडल आहेत. आता भारतीय मेडलची संख्या 81 वर पोहोचली आहे. भारताचा हा नवा विक्रम आहे.
3 / 5
2018 मध्ये भारताने 69 मेडल जिंकले होते. आतापर्यंत भारताने 81 मेडल जिंकले आहेत. दुसरीकडे, 2018 मध्ये भारताने 16 गोल्ड मेडल जिंकले होते. आता ही संख्या 18 पर्यंत पोहोचली आहे.
4 / 5
4 ऑक्टोबर नीरज चोप्रा भालाफेक स्पर्धेत गोल्ड जिंकलं. हे त्याचं सलग दुसरं गोल्ड पदक आहे. तसेच किशोर जेना यानेही या स्पर्धेत सिल्व्हर पदकाची कमाई केली.
5 / 5
भारताने 18 गोल्ड, 31 सिल्व्हर आणि 32 ब्राँझ मेडल पटकावले आहेत. भारताला क्रिकेट, हॉकी, स्क्वाश मिक्स्ड डबल्स या स्पर्धेतून पदकांची अपेक्षा आहे.