Asian Games : भारताचं गोल्ड मेडलसह शतक पूर्ण, कबड्डी क्रिकेटसह या खेळांमध्ये सुवर्ण कमाई
Asian Games 2023 : एशियन गेम्स स्पर्धेत गेल्या 72 वर्षातील सर्वोत्तम कामगिरी आहे. भारताने विविध खेळांमध्ये जबरदस्त कामगिरीचं प्रदर्शन करत शतक पूर्ण केलं आहे. एशियन गेम्सच्या 14 व्या दिवशी भारताने इतिहास रचला आहे.
1 / 6
एशियन गेम्स स्पर्धेत भारताने चमकदार कामगिरी केली आहे. 7 ऑक्टोबर 2023 रोजी म्हणजेच स्पर्धा सुरु झाल्यापासून 14 व्या दिवशी 100 हून अधिक पदकांची कमाई केली आहे. महिला कबड्डी संघाने देशासाठी गोल्ड जिंकताच पदकांची संख्या 100 झाली.
2 / 6
भारतीय खेळ इतिहासात दुसऱ्यांदा शंभर पदकं मिळवण्याचा मान मिळाला आहे. यापूर्वी 2010 दिल्ली कॉमनवेल्थ गेम्समध्ये 101 पदकं मिळवली होती. एशियन गेम्समध्ये ही संख्या आणखी पुढे जात 105 झाली आहे.
3 / 6
भारताने सर्वाधिक गोल्ड मेडल हे एथलेटिक्समध्ये जिंकले. यात सहा गोल्ड, 15 सिल्व्हर आणि 9 ब्रॉन्झ मेडलचा समावेश आहे. एथलीट्सने एकूण 29 पटकं जिंकली आहेत. तर शूटिंगमध्ये भारताला 22 मेडल मिळाले. तर तिरंदाजीच भारताने क्लीन स्वीप दिला. पुरुष टीम इव्हेंट, महिला टीम इव्हेंट, मिक्स्ड टीमसह वैयक्तिक स्पर्धेतही गोल्ड मेडल मिळवले.
4 / 6
भारताने पुरुष आणि महिला गटातील कबड्डीत सुवर्ण पदक पटकावले. तर क्रिकेटमध्येही अशीच कामगिरी केली आहे. पुरुष हॉकी संघाने गोल्ड मिळवलं. तर महिला हॉकी संघाला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. दुसरीकडे, मेन्स डबल्समध्ये भारताने सुवर्ण पदकांची कमाई केली आहे.
5 / 6
भारताकडे आता 28 सुवर्ण, 36 रौप्य आणि 41 कांस्य पदकं आहेत. एकूण 105 पदकं भारताने मिळवली आहेत.
6 / 6
एशियन गेम्समध्ये 100 हून अधिक पदकं कमावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंचं कौतुक केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की, 10 ऑक्टोबरला खेळाडूंच स्वागत करतील. तसेच त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं.