IND vs IRE: आयर्लंड दौऱ्यात चार खेळाडूंना मिळणार प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी! कोण आहेत ते जाणून घ्या
IND vs IRE: भारत विरुद्ध आयर्लंड यांच्या तीन सामन्यांची टी20 मालिका आहे. या मालिकेत भारताचं नेतृत्व जसप्रीत बुमराह करणार आहे. तसेच चार खेळाडू पहिल्यांदाच टीम इंडियाकडून खेळताना दिसणार आहेत. कोण आहेत ते खेळाडू जाणून घेऊयात..
1 / 7
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांची टी20 मालिका भारताने 3-2 ने गमावली. आता टीम इंडिया तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत आयर्लंडचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे. मालिकेतील पहिला सामना 18 ऑगस्टला डब्लिनमधील द व्हिलेज येथे होणार आहे.
2 / 7
मालिकेतील पुढील दोन सामने 20 आणि 23 ऑगस्ट रोजी याच मैदानावर खेळवले जातील. 25 सप्टेंबर 2022 पासून टीम इंडियातून बाहेर असलेला स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आयर्लंडविरुद्ध टी20 मालिकेतून पुनरागमन करणार आहे.
3 / 7
आयर्लंड विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. या मालिकेत टीम इंडियासाठी चार खेळाडू टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण करतील शक्यता आहे.
4 / 7
आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या अलिगडच्या रिंकू सिंगने चमकदार कामगिरी केली. एकट्याने काही सामने जिंकून देण्यात मदत केली. अगदी शेवटच्या षटकात पाच षटकार ठोकत गुजरातला पराभूत केलं होतं. यामुळे त्याची आयर्लंड मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. गेम फिनिशरची भूमिका बजावणाऱ्या रिंकूला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे.
5 / 7
बुमराहप्रमाणेच प्रसिद कृष्णाही दुखापतीनंतर भारतीय संघात पुनरागमन करत आहे. कर्नाटकच्या वेगवान गोलंदाजाने 20 ऑगस्ट 2022 रोजी झिम्बाब्वे विरुद्ध भारतासाठी शेवटचा खेळला होता. प्रसिदने आतापर्यंत 14 एकदिवसीय सामने खेळले असून 25 बळी घेतले आहेत. पण अजूनही टी20 संघात स्थान मिळालेलं नाही.
6 / 7
रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांच्या अनुपस्थितीत अष्टपैलू खेळाडू शाहबाज अहमदची आयर्लंड दौऱ्यासाठी वॉशिंग्टन सुंदरसोबत निवड करण्यात आली आहे. आयपीएलमध्ये आरसीबीसाठी चांगली कामगिरी करणाऱ्या शाहबाजने गेल्या वर्षी टीम इंडियासाठी तीन एकदिवसीय सामने खेळले होते. आता तो आयर्लंडविरुद्ध टी20 कॅप घालण्याची दाट शक्यता आहे.
7 / 7
जितेश शर्मा या वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंका आणि न्यूझीलंड मालिकेसाठी भारतीय टी20 संघाचा भाग होता. मात्र या त्याला संघात संधी मिळाली नाही. आता आयर्लंड दौऱ्यासाठी निवड झालेल्या जितेशला खेळण्याची संधी मिळू शकते.