पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला मिळाली नशिबाची साथ, चिराग-सात्विक जोडी थेट पोहोचली उपांत्यपूर्व फेरीत
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एका पदकाची कमाई केली आहे. आता आणखी काही पदकांची प्रतिक्षा आहे. आता बॅडमिंटन मेन्स डबल्समध्ये सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना सामना न खेळताच फायादा झाला आहे. या जोडीने उपांत्यपूर्व फेरीत जागा मिळवली आहे.
1 / 5
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला नशिबाची साथ मिळाली आहे. बॅडमिंटन मेन्स डबल्समध्ये सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा दुसरा सामना रद्द झाला होता. जर्मनीच्या मार्विन सीडेल आणि मार्क लॅम्सफूस या जोडीने दुखापतग्रस्त झाल्याने नाव मागे घेतलं. त्यामुळे भारीतय जोडीला फायदा झाला. (फोटो- GETTY)
2 / 5
सात्विक आणि चिराग जोडीने पहिल्या सामन्यात फ्रान्सच्या कोरवी लुकास आणि लेबर रोनन या जोडीचा 21-17, 21-14 या फरकाने पराभव केला. दुसरीकडे, फ्रान्सची हीच जोडी इंडोनिशियाच्या फझर अल्फियन आणि मुहम्मद रिया अर्दियांतो जोडीकडून पराभूत झाली. त्यामुळे सात्विक आणि चिराग जोडी ग्रुपमध्ये टॉप 2 राहिल हे निश्चित आहे. (फोटो- GETTY)
3 / 5
सात्विक आणि चिराग जोडीने टॉप 2 सह ग्रुप स्टेजमधील सामने संपवेल. त्यामुळे या जोडीने उपांत्यपूर्व फेरीत जागा निश्चित केली आहे. यासह सात्विक आणि चिराग ऑलिम्पिक क्वॉर्टर फायनलमध्ये पोहोचणारी भारतीची पहिली जोडी ठरली आहे. (फोटो- GETTY)
4 / 5
भारताच्या या जोडीचा पुढचा सामना 30 जुलैला इंडोनिशियाच्या फझर अल्फियन आणि मुहम्मद रिया अर्दियांतो जोडीसोबत होील. जर या सामन्यात भारताने इंडोनिशाचा पराभव केला तर ग्रुप स्टेजमध्ये टॉपवर राहील. (फोटो- GETTY)
5 / 5
सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा सामना 30 जुलैला संध्याकाळी 5.30 वाजता होणार आहे. या जोडीची नजर विजयासह उपांत्यफेरी गाठण्याकडे असेल. ही जोडी मेडलसाठी दावेदार मानली जात आहे. त्यामुळे या जोडीकडून खूप अपेक्षा आहेत. (फोटो- GETTY)