IND vs AUS : भारताची डे-नाईट कसोटीत अशी आहे आकडेवारी, एका सामन्यात पराभव आणि..
बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला असून 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता भारताचा दुसरा सामना 6 डिसेंबरला होणार असून एडिलेडमध्ये डे नाईट सामना आहे. पिंक बॉलने हा सामना खेळला जाणार आहे.
1 / 5
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीकोनातून भारतासाठी ऑस्ट्रेलिया मालिका खूपच महत्त्वाची आहे. भारताला काहीही करून 4 सामने जिंकायचे आहेत. असं असताना पहिला सामना जिंकून भारताने आशा पल्लवित केल्या आहेत. मात्र दुसरा कसोटी सामना एडिलेडमध्ये डे नाईट होणार आहे. पिंक बॉलने हा सामना होणार असून भारताचं टेन्शन वाढलं आहे.
2 / 5
भारताने आतापर्यंत चार डे नाईट कसोटी सामने खेळले आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध एडिलेडमध्ये हा पाचवा डे नाईट सामना असणार आहे. भारताची डे नाईट कसोटीत आतापर्यंत चांगली कामगिरी राहिली आहे. भारताने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, बांग्लादेश आणि श्रीलंकेविरुद्ध डे नाईट सामना खेळला आहे.
3 / 5
भारताने चार पैकी एका सामन्यात पराभव सहन केला आहे. पण हा पराभव डे नाईट सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या एडिलेडवर मिळाला आहे. आता याच मैदानावर दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. हा सामना डे नाईट आहे, त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली आहे.
4 / 5
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2020 मध्ये एडिलेडमध्ये डे नाईट कसोटी सामना खेळला होता. या सामन्यात भारताला 8 विकेट मात मिळाली होती. या सामन्यात कर्णधारपद विराट कोहलीकडे होतं.
5 / 5
दुसऱ्या कसोटीसाठी कर्णधार रोहित शर्माचं कमबॅक झालं आहे. त्यामुळे रोहित शर्मावर मोठी जबाबदारी असणार आहे. या सामन्यातील निकालावरच भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित काय ते समजणार आहे.