अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताचा हा खेळाडू रचणार इतिहास, बस्स इतकं काम केलं की झालं
अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत टीम इंडियाने धडक मारली आहे. एकही सामना न गमावता टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली आहे. उपांत्य फेरीत भारताने दक्षिण अफ्रिकेचा 2 विकेट्सने पराभव केला आणि अंतिम फेरी गाठली. आता अंतिम फेरीत एक इतिहास रचला जाणार आहे.
1 / 6
भारताने उपांत्य फेरीत दक्षिण अफ्रिकेचा धुव्वा उडवला. एक क्षण पराभवाच्या छायेखाली असताना उदय सहारन आणि सचिन धस यांनी डाव सावरला. तसेच विजयाच्या उंबरठ्यावर आणून सोडलं. आता अंतिम फेरीत भारताचा सामना पाकिस्तान किंवा ऑस्ट्रेलिया यांच्यापैकी एकाशी होईल.
2 / 6
भारताच्या विजयी मालिकेत फलंदाजांसोबत गोलंदाजांनीही भरीव कामगिरी केली आहे. जेव्हा आवश्यक होतं त्यावेळी विकेट्स घेतल्या आहेत. यात सौम्य पांडे सर्वोत्तम गोलंदाजीचं प्रदर्शन केलं.
3 / 6
अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करण्याऱ्या गोलंदाजामध्ये सौम्या पांडेचा नंबर येतो. सध्या या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. दक्षिण अफ्रिकेच्या क्वेना माफाफाने 6 सामन्यात 21 विकेट्स घेऊन पहिला क्रमांक गाठला आहे.
4 / 6
भारतीय अंडर 19 संघात असलेल्या सौम्या पांडेने या विश्वचषकातील आतापर्यंतच्या 6 सामन्यांत 8.47 च्या सरासरीने 17 बळी घेतले आहेत. सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम मोडण्यासाठी त्याला आणखी 6 विकेट्स घ्याव्या लागतील.
5 / 6
सौम्या पांडेने आतापर्यंत तीन वेळा एका सामन्यात 4-4 विकेट घेतल्या आहेत. आफ्रिकेचा खेळाडू क्वेन माफाका याचा विक्रम मोडण्यासाठी अंतिम फेरीत सर्वोत्तम गोलंदाजीचं प्रदर्शन करावं लागेल.
6 / 6
भारतीय संघाने अंडर19 विश्वचषक 2024 च्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केलं आहे. आता सामना ऑस्ट्रेलिया किंवा पाकिस्तानशी होऊ शकतो. या दोघांमध्ये उपांत्य फेरीचा दुसरा सामना 8 फेब्रुवारी रोजी विल्समोर पार्क, बिनोनी येथे खेळवला जाईल.