टीम इंडिया बांगलादेश विरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज आहे. उभयसंघात एकूण 2 सामने होणार आहेत. त्यापैकी पहिल्या सामन्यासाठी बीसीसीआयने संघ जाहीर केला आहे. टीम इंडियाचे 5 खेळाडू हे पहिल्यांदाच बांगलादेश विरुद्ध खेळू शकतात. तर त्यापैकी एका खेळाडूचं पदार्पण होऊ शकतं. (Photo Credit - Bcci))
यशस्वी जयस्वाल याने आतापर्यंत टीम इंडियाचं 9 कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. यशस्वीने 9 सामन्यात 1 हजार 28 धावा केल्या आहेत. यशस्वीची बांगलादेश विरुद्ध प्लेइंग ईलेव्हनमध्ये स्थान निश्चित समजलं जात आहे. अशात यशस्वीची ही बांगलादेश विरुद्ध खेळण्याची पहिलीच वेळ ठरेल. (Photo Credit - Yashasvi Jaiswal X Account)
सरफराज खान याने 15 फेब्रुवारी 2024 रोजी इंग्लंड विरुद्ध कसोटी पदार्पण केलं. सरफराजने आतापर्यंत 3 सामन्यात 200 धावा केल्या आहेत. सरफराजची ही बांगलादेश विरुद्ध खेळण्याची पहिली वेळ ठरु शकते. (Photo Credit - Bcci)
ध्रुव जुरेल यानेही इंग्लंड विरुद्ध कसोटी पदार्पण केलं. ध्रुवनेही सरफराजप्रमाणे 3 सामनेच खेळले आहेत. अशात ध्रुवचीही बांगलादेश विरुद्ध खेळण्याची पहिली वेळ ठरु शकते. (Photo Credit - Dhruv Jurel X Account)
आकाश दीप याला एकमेव कसोटी खेळण्याचा अनुभव आहे. आकाशने इंग्लंड विरुद्ध पदार्पण केलं होतं. आकशाला संधी मिळाल्यास त्याची बांगलादेश विरुद्ध खेळण्याची पहिली वेळ असेल. (Photo Credit - Bcci)
तसेच यश दयाल याची पहिल्यांदाच कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. अशात यशला संधी मिळाल्यास त्याचं पदार्पण ठरेल. (Photo Credit - Bcci)
बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल. (Photo Credit -Bcci)