India vs England : भारताचा पहिला सराव सामना कधी आणि किती वाजता? जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर
India vs England ODI World Cup Warm-up Match: भारताचा पहिला सराव सामना जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंडशी होणार आहे. हा सामना गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघ आधीच गुवाहाटीला पोहोचले असून नेटमध्ये सराव सुरू केला आहे.
1 / 7
वनडे वर्ल्डकप स्पर्धेला अवघ्या काही दिवसात सुरुवात होणार आहे. 5 ऑक्टोबरला इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे. याआधी आजपासून सराव सामने सुरू होणार आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दोन सराव सामने खेळणार आहे.
2 / 7
भारताचा पहिला सराव सामना जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंडशी होणार आहे. हा सामना गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघ आधीच गुवाहाटीला पोहोचले असून नेटमध्ये सराव सुरू आहे.
3 / 7
भारत आणि इंग्लंड यांच्यातील सराव सामना दुपारी 2 वाजता सुरू होईल. स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर हा सामना लाईव्ह पाहता येतील. हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर थेट लाईव्ह सामना पाहू शकता.
4 / 7
जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघ गुरुवारी संध्याकाळी मुंबईत दाखल झाला आणि मध्यरात्री गुवाहाटीला पोहोचला. भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघ रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये मुक्काम करत आहे.
5 / 7
टीम इंडियात शेवटच्या दिवशी मोठा बदल करण्यात आला आहे. अष्टपैलू अक्षर पटेल याला दुखापत झाल्याने रविचंद्रन अश्विनला संधी देण्यात आली आहे.
6 / 7
टीम इंडिया: रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, इशान किशन, केएल राहुल, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकुर, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शर्मी बुमराह , मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.
7 / 7
इंग्लंड: जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गस ऍटकिन्सन, जॉनी बेयरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल रशीद, जो रूट, बेन स्टोक्स, रीस टोपले, डेव्हिड विली, मार्क वुड , ख्रिस वोक्स.