भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात पहिला टी20 सामना डरबनमध्ये सुरु आहे. या सामन्यात संजू सॅमसनचा आक्रमक अंदाज पाहायला मिळाला. त्याने दक्षिण अफ्रिकेच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं.
दक्षिण अफ्रिकेविरुद्ध विकेट बॅट्समन संजू सॅमसन जबरदस्त खेळी केली. अवघ्या 47 चेंडूत 9 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 100 धावांची खेळी केली. संजू सॅमसनने 50 चेंडूत 10 षटकार आणि 7 चौकार मारत 107 धावा केल्या. पीटरच्या गोलंदाजीवर ट्रिस्टन स्टब्सने त्याचा झेल पकडला आणि खेळी संपली.
संजू सॅमसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग दुसऱ्यांदा शतक ठोकलं आहे. अशी कामगिरी करणारा भारताचा पहिला भारतीय ठरला आहे. यापूर्वी त्याने बांगलादेशविरुद्ध शतक ठोकलं होतं.
डरबनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात शतक झळकावून इतिहास रचला. आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सलग दोन शतके झळकावणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. यापूर्वी 3 खेळाडूंनी ही कामगिरी केली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संजू सॅमसनपूर्वी सलग दोन शतक करण्याची किमया तीन फलंदाजांनी साधली आहे. गुस्तव मॅकेऑन, रीली रॉस्सो, फिल सॉल्ट आणि आता संजू सॅमसनने अशी कामगिरी केली आहे.