वनडे क्रिकेट इतिहासात भारतीय महिला संघाची मोठी कामगिरी, दुसऱ्यांदा नोंदवला तसाच विक्रम
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय महिला संघाने जबरदस्त खेळी केली. 50 षटकात 5 गडी गमवून 358 धावा केल्या आणि विजयासाठी 359 धावांचं दिलं आहे. यासह भारताने आपल्याच एका विक्रमाची बरोबरी केली आहे.
1 / 5
भारताने दुसऱ्या वनडे सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य होता असंच म्हणावं लागेल. कारण भारताने 50 षटकात 5 गडी गमवून 358 धावा केल्या.स्मृती मंधाना (53), प्रतिका रावल (76), हरलीन देओल (115) आणि जेमिमा रॉड्रिग्स (52) यांच्या शानदार फलंदाजीमुळे टीम इंडियाला एवढी मोठी धावसंख्या उभारता आली.
2 / 5
भारताने वनडे क्रिकेटमध्ये आपल्याच जुन्या विक्रमाची बरोबरी केली आहे. यापूर्वी भारताने 2017 मध्ये वनडे क्रिकेट सामन्यात आयर्लंडविरुद्ध 358 धावा केल्या होत्या.भारताची वनडे क्रिकेट इतिहासातील सर्वोच्चा धावसंख्या आहे. आता या विक्रमाची बरोबरी साधली असून तितक्याच धावा वेस्ट इंडिजविरुद्ध केल्या आहेत.
3 / 5
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या हरलिन देओलने तब्बल 6 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक पूर्ण केले. आपल्या डावात 103 चेंडूंचा सामना करणाऱ्या हरलिनने 16 चौकारांच्या मदतीने 115 धावांची शतकी खेळी खेळली.
4 / 5
बंगळुरू येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 बाद 325 धावांचा विक्रम मागे टाकला आहे. घरच्या मैदानावर ही भारताची सर्वोच्च धावसंख्या आहे. पहिल्या सामन्यात भारताने 9 बाद 314 धावा केल्या होत्या. आता घरच्या मैदानावर तिसरी सर्वोच्च धावसंख्या आहे.
5 / 5
वुमन्स वनडे सर्वोच्च धावांचा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर आहे. न्यूझीलंडच्या महिला संघान 8 जून 2018 रोजी आयर्लंडविरुद्ध डब्लिन मैदानात खेळताना 50 षटकात 4 गडू गमवून 491 धावा केल्या होत्या. पहिल्या चार क्रमांकावर न्यूझीलंडचा संघ आहे हे विशेष..त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा संघ येतो.