भारताची ‘फुलराणी’ सायना नेहवालचे क्रिकेटबाबत मोठे विधान, एक गोष्टीचं वाईट की, क्रिकेट..
भारताची स्टार टेनिसपटू सायना नेहवाल चर्चेत आली आहे. सायनाने क्रिकेटबाबत केलेल्या विधानाची सोशल मीडियावर चर्चा होता आहे. सायना असं काय म्हणाली की ज्याची इतकी चर्चा होतेय. जाणून घ्या.
1 / 5
भारताची फुलराणी म्हणून ओळखली जाणारी सायना नेहवालचे अनेक चाहते आहेत. ज्या भारतामध्ये क्रिकेटचा जयजयकार होतो तिथे सायनाने आपल्या खेळाची आणि स्वत: ची वेगळी ओळख तयार केली आहे.
2 / 5
निखिल विजयेंद्रच्या पॉडकास्टवर सायना नेहवाल आणि तिचा पती पी कश्यप आले होते. यावेळी दोघांनी दिलखुलासपणे अनेक गोष्टींवर चर्चा केली. यावेळी क्रिकेटबाबत सायना काय म्हणाली ते पाहा.
3 / 5
भारतामध्ये खेळाची संस्कृती वेगळी आहे. क्रिकेटकडे खूप जास्त महत्त्वा दिलं जातं याचं वाईट वाटतं. पण तसं पाहायला गेलं तर बॅडमिंटन, बास्केटबॉल, टेनिस हे खेळ शारीरिकदृष्ट्या अवघड असून त्यासाठी तुमच्याकडे स्किल असणं गरजेचं असावे लागतात, असं सायना नेहवाल म्हणाली.
4 / 5
नीरज चोप्रा, मीराबाई चानू आणि विनेश फोगट हे आम्हाला लोकं ओळखतात याचं कारण म्हणजे आम्ही सातत्याने चांगली कामगिरी केली. वर्तमानपत्रामध्ये आम्ही झळकलो त्यामुळे लोक आम्हाला ओळखतात, असंही सायना बोलली.
5 / 5
सायनाने 2012 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य, 2015 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य आणि 2017 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले होते. तर 2010 आणि 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं होतं.