मोहम्मद रिझवान येणार अडचणीत! ‘त्या’ कृतीसाठी भारतीय वकिलाने केली आयसीसीकडे तक्रार, जाणून घ्या प्रकरण

| Updated on: Oct 16, 2023 | 3:32 PM

Mohammad Rizwan : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानला भारताकडून पराभवाची धूळ चाखावी लागली आहे. भारताने वनडे वर्ल्डकप स्पर्धेत आठव्यांदा पराभूत केलं आहे. असं असताना दुसरीकडे, मोहम्मद रिझवान याच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.जाणून संपूर्ण प्रकरण..

1 / 6
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानची सुरुवात विजयाने झाली. सुरुवातीला नेदरलँड आणि त्यानंतर श्रीलंकेला पराभूत केलं. मात्र भारताने पाकिस्तानला पराभूत करत विजयरथ रोखला. दुसरीकडे पाकिस्तानचा स्टार विकेटकीपर मोहम्मद रिझवान अडचणीत आला आहे.  (Photo : PCB Twitter)

2 / 6
मोहम्मद रिझवान विरोधात भारतीय वकील विनीत जिंदल याने आयसीसीकडे तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे त्याच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

3 / 6
वकील विनीत जिंदल यांनी रिझवानने नेदलँड विरुद्धच्या सामन्यात मैदानात नमाज अदा केल्याप्रकरणी आक्षेप घेतला आहे. तसेच याबाबत तक्रार केली आहे. (Photo : PCB Twitter)

4 / 6
नेदरलँड विरुद्धच्या सामन्यात रिझवानने ड्रिंक्स ब्रेकमध्ये नमाज अदा केली होती. त्याचे हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo : PCB Twitter)

5 / 6
मोहम्मद रिझवान याने असं करणं म्हणजे स्पिरिट ऑफ क्रिकेट आणि आयसीसी नियमांच्या विरोधात आहे, असं विनीत जिंदल यांनी तक्रारीत म्हंटलं आहे.

6 / 6
श्रीलंका विरुद्धच्या सामन्यातही शतक ठोकल्यानंतर रिझवान वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. शतकी खेळी त्याने गाजामधील लोकांना समर्पित केली होती. (Photo : PCB Twitter)