Pratika Rawal : प्रतिका रावलची आयर्लंडविरुद्ध 154 धावांची विक्रमी खेळी, 19 वर्षांआधीचा रेकॉर्ड ब्रेक

| Updated on: Jan 15, 2025 | 7:41 PM

IND W vs IRE W Pratika Rawal : प्रतिका रावल हीने आयर्लंड विरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात दीडशतकी खेळी केली. प्रतिकाने यासह 19 वर्षांआधीचा एक रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

1 / 6
टीम इंडियाने आयर्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात इतिहास घडवला. टीम इंडियाने 436 धावांचा डोंगर उभा केला. टीम इंडियाची ही एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या ठरली. टीम इंडियाकडून प्रतिका रावल हीने सर्वाधिक धावा केल्या.

2 / 6
प्रतिका रावल हीने कॅप्टन स्मृती मानधना हीच्यासह ओपनिंगला येत दीडशतकी खेळी केली. प्रतिकाने 129 बॉलमध्ये 154 रन्स केल्या. प्रतिकाने या खेळीत 20 चौकार आणि 1 षटकार लगावला.

3 / 6
प्रतिकाने या खेळीसह एक विक्रम मोडीत काढला. प्रतिका टीम इंडियासाठी वनडेत मोठी खेळी करणारी तिसरी महिला फलंदाज ठरली.

4 / 6
टीम इंडियासाठी सर्वाधिक धावांचा विक्रम हा दीप्ती शर्मा हीच्या नावावर आहे. दीप्तीने आयर्लंडविरुद्ध 217 बॉलमध्ये 188 धावा केल्या होत्या.

5 / 6
त्यानंतर दुसऱ्या स्थानी नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर विराजमान आहे. हरमनप्रीतने 2017 साली 171 धावांची खेळी केली होती.

6 / 6
त्यानंतर आता प्रतिकाने ही खेळी केली आहे. प्रतिकाने 154 धावांच्या खेळीसह 19 वर्षांआधीचा रेकॉर्ड ब्रेक केला. प्रतिकाने जया शर्मा यांना मागे टाकलं आहे. जया शर्मा यांनी 2005 साली 138 धावांची खेळी केली होती.  (All Photo Credit : Bcci)