INDW vs SAW : शफाली वर्माने द्विशतकी खेळीसह रचला मोठा विक्रम, काय ते जाणून घ्या
भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका महिला क्रिकेट संघात कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 4 गडी बाद 479 धावा केल्या आहेत. या शफाली वर्माने 205 धावांची खेळी केली आहे. या खेळीसह तिने एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे.
1 / 6
चेन्नईच्या चेपॉक मैदानावर भारतीय महिला संघाची लेडी सेहवाग नावाने प्रसिद्ध असलेली शफाली वर्मा गरजली. कसोटी सामन्यातील पहिल्याच दिवशी शफाली वर्माने मोठी कामगिरी केली. भारतीय महिला क्रिकेटमध्ये 22 वर्षांपासून असलेला दुष्काळ दूर केल आहे. शफाली वर्माने या सामन्यात द्विशतक ठोकलं.
2 / 6
भारतीय महिला क्रिकेटरने 22 वर्षानंतर द्विशतक ठोकण्याची किमया केली आहे. यापूर्वी भारताची माजी कर्णधार मिताली राज हीने द्विशतक ठोकलं होतं. 2002 मध्ये इंग्लंडविरुद्ध 214 धावांची खेळी केली होती.
3 / 6
शफाली वर्माने आपल्या कसोटी कारकिर्दितील पहिलं द्विशतक ठोकलं आहे. महिला कसोटी क्रिकेट इतिहासातील सर्वात वेगवान द्विशतक करण्याचा विक्रम तिने आपल्या नावावर केला आहे. 194 चेंडूत तिने द्विशतक पूर्ण केलं. यात तिने 43 चौकार आणि 8 षटकार मारले.
4 / 6
महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद द्विशतक झळकावण्याचा विक्रम यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या एनाबेल सदरलँडच्या नावावर होता. तिने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 248 चेंडूंचा सामना करत द्विशतक झळकावले होते.
5 / 6
दुसरीकडे, शफाली वर्माने स्फोटक शतक झळकावून नवा इतिहास रचला आहे. तिने या खेळीतून 40 वर्षे जुना विश्वविक्रम आहे. शफाली वर्माने 113 चेंडूत शतक ठोकलं. 1984 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध जेनेट ब्रिटनने 137 चेंडूत शतक ठोकून हा विश्वविक्रम रचला होता.
6 / 6
शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना यांनी पहिल्या विकेटसाठी 292 धावांची भागीदारी केली. या भागीदारीसह पाकिस्तानचा 20 वर्ष जुना विक्रम मोडीत काढला आहे. 2004 मध्ये पाकिस्तानच्या किरण बलोच आणि साजिदा शाह यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या विकेटसाठी 241 धावांची भागीदारी केली होती.