MI vs RR : मुंबईनं राजस्थानला नमवलं तरी यशस्वी जयस्वाल जिंकली मनं, पहिल्या शतकाने मोडले अनेक विक्रम
IPL 2023 : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयपीएल इतिहासातील 1000 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात पार पडला. हा सामना मुंबईने 6 गडी आणि 3 चेंडू राखून जिंकला. असं असलं तरी राजस्थानच्या यशस्वी जयस्वालच्या शतकाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
1 / 7
मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात यशस्वी जयस्वालने शतक झळकावलं. त्याने अवघ्या 53 चेंडूत शतक पूर्ण केलं. या शतकासह त्याने काही विक्रम मोडीत काढले आहेत. (Photo : IPL/BCCI/Twitter)
2 / 7
यशस्वी जयस्वालने 62 चेंडूत 8 उत्तुंग षटकार आणि 16 चौकारांच्या मदतीने 124 धावा केल्या. ही धावसंख्या त्याने 200 च्या स्ट्राइक रेटने पूर्ण केली. (Photo : IPL/BCCI/Twitter)
3 / 7
राजस्थान रॉयल्ससाठी सर्वाधिक वैयक्तिक धावांचा विक्रम आता यशस्वी जयस्वालच्या नावार आहे. जोस बटलरने 64 चेंडूत 124 धावा केल्या. पण जयस्वालने 62 चेंडूत 124 धावा केल्या आहेत. (Photo : IPL/BCCI/Twitter)
4 / 7
आयपीएल इतिहासात सर्वाधिक धावा करणारा अनकॅप्ड खेळाडू म्हणून जयस्वालचं नाव कोरलं गेलं आहे.2011 मध्ये पंजाब किंग्सकडून खेळलेल्या पॉल वल्थाटीने चेन्नईविरुद्ध 120 धावा केल्या होत्या. (Photo : IPL/BCCI/Twitter)
5 / 7
मुंबई इंडियन्स विरुद्ध शतक झळकावणारा जयस्वाल हा सर्वात तरुण खेळाडू आहे. 21 वर्षीय यशस्वी जयस्वालने 53 चेंडूत शतक पूर्ण केलं. (Photo : IPL/BCCI/Twitter)
6 / 7
जयस्वाल हा राजस्थान रॉयल्ससाठी शतक झळकावणारा सर्वात तरूण खेळाडू ठरला. यशस्वी जयस्वालचं वय 21 वर्षे आणि 123 दिवस इतकं आहे. (Photo : IPL/BCCI/Twitter)
7 / 7
आयपीएल 2023 मध्ये मोठी धावसंख्या करण्याचा विक्रम यशस्वीच्या नावावर आहे. या स्पर्धेत हा विक्रम आधी वेंकटेश अय्यरच्या नावावर होता. त्याने 104 धावा केल्या होत्या. आता यशस्वीने 124 धावा केल्या आहेत. (Photo : IPL/BCCI/Twitter)