मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा क्रिकेट जगतातला आक्रमक ओपनर बॅट्समन आहे. सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये प्रतिस्पर्धी बोलर्सवर तुटून पडायचं आणि पॉवरप्लेमध्ये खोऱ्याने धावा ओढायच्या, हे त्याचं वैशिष्ट्य… वन डे क्रिकेटमध्ये तीन द्विशतक त्याच्या नावावर आहेत तर मर्यादित ओव्हर्सच्या सामन्यात सर्वोत्तम ओपनर बॅट्समन म्हणून तो ओळखला जातो. त्याला सुरुवातीलाच आऊट करणं, हे प्रतिस्पर्धी संघांसाठी कधीही चांगलं. एकदा का त्याने खेळपट्टीवर ठाण मांडलं तर त्याने मोठी इनिंग खेळलीच म्हणून समजा.
दक्षिण आफ्रिकेचा विकेट कीपर फलंदाज क्विंटन डिकॉकची बॅट सदा बोलत असते. त्याने आतापर्यंत 66 आयपीएल मॅचमध्ये 1959 रन्स केले आहेत. सध्याही तो तुफान फॉर्ममध्ये आहे. मुंबईकडून ओपनिंगला येऊन त्याने अनेकदा आक्रमक सुरुवात करुन मुंबईच्या विजयाचा पाया रचलाय.
भारताचा नवोदित तळपता सूर्य… ज्याच्या भात्यात एकापेक्षा एक आक्रमक फटक्यांचा समावेश आहे. लेग साईटला आणि ऑफ साईटलाही तो तितक्याच ताकदीने शॉट्स मारतो. ज्याच्या बॅटला सीमारेष 30 यार्डासारखी वाटते. मागील काही वर्षांत सुर्यकुमारने अनेक यादगार खेळी खेळल्या आहेत.
ईशान किशन भारताचा युवा फलंदाज.. त्याच्या बॅटिंगने त्याने सर्वांच्या नजरा आपल्याकडे वळवल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या सिरीजमध्ये त्याने आपल्या बॅटिंगचा जलवा दाखवला. आयपीएल 2020 मध्ये त्याने मुंबईकडून सर्वांत जास्त रन्स केले. तसंच आयपीएलच्या 51 मॅचमध्ये त्याने 1211 रन्स केले. 2020 साली मुंबईला चॅम्पियन बनवण्यात इशान किशनचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे.
जागतिक क्रिकेटमधला सर्वांत मोठा बिग हिटर म्हणून हार्दिक पांड्याचं नाव घेतलं जातं. मुंबईसाठी हार्दिकने अनेक मोठ्या इनिंग खेळल्या आहेत. कमीत कमी बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा ठोकण्यात तो पटाईत आहे.
क्रुणाल पांड्याच्या बॅटमध्ये ताकद आहे. त्याच्याकडे अनेक क्लासिक फटके आहेत. त्याने हे वेळोवेळी दाखवून दिलंय. आयपीएलच्या पाठीमागच्या तीन ते चार हंगामात त्याने मुंबईकडून संधी मिळेल तेव्हा बहारदार कामगिरी केलीय. यंदाही तशीच कामगिरी करण्यास तो सज्ज आहे.
मुंबईकडून खेळत असलेला कायरन पोलार्ड सर्वांत विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो. सामना पलटवण्याची त्याच्या बॅटमध्ये ताकद आहे. मुंबई इंडियन्सला काही सामने पोलार्डने एकहाती जिंकवून दिले आहेत. अशक्यप्राय वाटणारे अनेक सामने पोलार्डच्या बॅटमुळे मुंबई जिंकलीय.
ट्रेंट बोल्टच्या घातक गोलंदाजीसमोर बऱ्याचवेळी प्रतिस्पर्धी संघाचे बॅट्समन गुडघे टेकतात. तो संघाला पाहिजे तेव्हा विकेट्स मिळवून देण्यात माहिर आहे. गेल्या मोसमात मुंबईला चॅम्पियन्स बनविण्यात त्यानेही खारीचा वाटा उचलला आहे.
नुकताच लग्नबंधनात अडकलेला यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह आयपीएलच्या रणसंग्रामासाठी सज्ज झाला आहे. 2013 पासून तो मुंबईकडून खेळतो आहे. पाठीमागच्या मोसमात त्याने मुंबईकडून 27 विकेट्स घेऊन मुंबईला चॅम्पियन बनविण्यात सिंहाचा वाटा उचलला.
पियुष चावला... मुंबईच्या संघातील एकमेव नियमित फिरकीपटू... ज्याच्या फिरकीच्या जाळ्यात भलेभले दिग्गज अडकतात. आयपीएलचे बरेचसे हंगाम त्याने कोलकात्याकडून खेळले आहेत. आता मुंबईला सहाव्यांदा चॅम्पियन बनविण्यासाठी तो झटतो आहे.
नॅथन कुल्टर नाईल, ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज... लाईन टू लाईन गोलंदाजी करण्यासाठी तो प्रसिद्ध आहे. त्याचा टप्पाही अचूक आहे.