IPL 2022: दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, एनरिक नॉर्खिया स्पर्धेबाहेर, संघासमोर तीन पर्याय
इंडियन प्रीमियर लीग 2022 सुरू होण्यापूर्वीच दिल्ली कॅपिटल्सला वाईट बातमी मिळाली आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खिया आयपीएल 2022 मधून बाहेर पडला आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, एनरिक नॉर्खिया दुखापतीतून अद्याप सावरलेला नाही.
1 / 5
इंडियन प्रीमियर लीग 2022 सुरू होण्यापूर्वीच दिल्ली कॅपिटल्सला वाईट बातमी मिळाली आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खिया आयपीएल 2022 मधून बाहेर पडला आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, एनरिक नॉर्खिया दुखापतीतून अद्याप सावरलेला नाही. त्यामुळे तो या महिन्याच्या अखेरीस सुरु होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. एनरिक नॉर्खिया हिपच्या दुखापतीशी झुंज देत आहे. बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी त्याला दक्षिण आफ्रिकेच्या संघात स्थान मिळालेलं नाही.
2 / 5
नॉर्खिया हा दिल्ली कॅपिटल्सने संघात कायम ठेवलेल्या चार खेळाडूंपैकी एक आहे. नॉर्खियाला दिल्लीने 6.50 कोटींमध्ये संघात कायम ठेवलं आहे. गेल्या दोन मोसमात नॉर्खियाने चांगली कामगिरी केली होती. नॉर्खियाने 2020 मध्ये 22 विकेट घेतल्या होत्या. तर गेल्या मोसमात त्याने 8 सामन्यात 12 विकेट घेतल्या होत्या.
3 / 5
दरम्यान, नॉर्खिया स्पर्धेबाहेर पडल्याने दिल्ली आता त्याच्या जागी पर्यायी खेळाडू शोधण्याकडे लक्ष देत आहे. असे तीन गोलंदाज आहेत जे दिल्लीच्या संघात नॉर्खियाची जागा घेऊ शकतात. त्यापैकी पहिले नाव म्हणजे इशांत शर्मा. हा खेळाडू आयपीएल-2022 च्या लिलावात विकला गेला नाही. मागील हंगामात तो दिल्लीचा भाग होता. इशांत फ्रँचायझीच्या सेटअपचा एक भाग आहे आणि त्याला अनुभव आहे. अशा स्थितीत दिल्ली पुन्हा एकदा त्याला आपल्यासोबत जोडू शकते. इशांतने आयपीएलमध्ये आतापर्यंत 93 सामने खेळले असून 73 बळी घेतले आहेत. (IPL Photo)
4 / 5
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज अँड्र्यू टाय याला लिलावात कोणीही विकत घेतले नाही. त्याची मूळ किंमत एक कोटी रुपये होती, पण त्याला खरेदीदार मिळाला नाही. तो नॉर्खियाच्या जागी चांगला पर्याय ठरू शकतो. तो यापूर्वी पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सकडून खेळला आहे. त्याने आतापर्यंत 27 आयपीएल सामने खेळले असून 40 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. टाय IPL-2018 मध्ये पंजाबकडून खेळला आणि सर्वाधिक विकेट्स घेण्यात यशस्वी झाला. (IPL Photo)
5 / 5
ऑस्ट्रेलियाचा केन रिचर्डसन नॉर्खियाची जागा घेऊ शकतो. या उजव्या हाताच्या गोलंदाजाची लिलावात विक्री झाली नाही. त्याने त्याची मूळ किंमत 1.5 कोटी रुपये ठेवली होती. आयपीएलमध्ये या खेळाडूने आतापर्यंत 15 सामने खेळले असून 19 विकेट घेतल्या आहेत. (IPL Photo)