IPL 2022: जेसन रॉयच्या जागी गुजरात टायटन्सच्या ताफ्यात धडाकेबाज फलंदाजाची एंट्री, 14 चेंडूत ठोकलंय अर्धशतक

| Updated on: Mar 08, 2022 | 4:45 PM

आयपीएल 2022 स्पर्धा सुरू होण्यापूर्वी, गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला जेव्हा त्यांचा सलामीवीर जेसन रॉय याने स्पर्धेतून अचानक माघार घेतली. मात्र, आता जेसन रॉयऐवजी गुजरात टायटन्सने आपल्या संघात एका नव्या खेळाडूचा समावेश केला आहे.

1 / 5
आयपीएल 2022 स्पर्धा सुरू होण्यापूर्वी, गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला जेव्हा त्यांचा सलामीवीर जेसन रॉय याने स्पर्धेतून अचानक माघार घेतली. मात्र, आता जेसन रॉयऐवजी गुजरात टायटन्सने आपल्या संघात एका नव्या खेळाडूचा समावेश केला आहे. (फोटो-गुजरात टायटन्स इंस्टाग्राम)

2 / 5
गुजरात टायटन्सने अफगाणिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज रहमानउल्ला गुरबाजला आपल्या संघात सामील केले आहे. गुरबाज एक सलामीवीर देखील आहे आणि तो त्याच्या वेगवान फलंदाजीसाठी ओळखला जातो. (फोटो-गुरबाज इंस्टाग्राम)

3 / 5
रहमानउल्ला गुरबाजने गेल्या वर्षी टी-10 लीगमध्ये अवघ्या 14 चेंडूत अर्धशतक ठोकून खळबळ उडवून दिली होती. दिल्ली बुल्सकडून खेळताना गुरबाजने अवघ्या 16 चेंडूत 57 धावा केल्या होत्या. (फोटो-गुरबाज इंस्टाग्राम)

4 / 5
गुरबाजने 69 टी-20 सामन्यांमध्ये 1620 धावा केल्या आहेत आणि त्यामध्ये त्याचा स्ट्राइक रेट 150 पेक्षा जास्त आहे. गुरबाज लंका प्रीमियर लीग, पाकिस्तान क्रिकेट लीगमध्ये खेळला आहे आणि आता तो आयपीएलमध्ये पदार्पण करू शकतो. (फोटो-गुरबाज इंस्टाग्राम)

5 / 5
गुरबाज मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये एक अप्रतिम फलंदाज आहे. अफगाणिस्तानसाठी 9 एकदिवसीय सामन्यांमध्ये या खेळाडूने 50 पेक्षा जास्त सरासरीने 428 धावा केल्या आहेत. गुरबाजने केवळ 9 एकदिवसीय सामन्यांमध्ये 3 शतके झळकावली आहेत. (फोटो-गुरबाज इंस्टाग्राम)