Arjun Tendulkar IPL 2022: अर्जुन तेंडुलकर आयपीएल डेब्यू करणार? मुंबई इंडियन्सच्या पोस्टवर बहीण साराची रिॲक्शन व्हायरल
इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत सर्वाधिक 5 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सची (MI) 2022 च्या मोसमात अवस्था बिकट झाली आहे. मुंबईच्या संघाला विजयाचे खातेही उघडता आले नाही. या संघाने आतापर्यंत पाच सामने खेळले असून सर्व सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
1 / 5

2 / 5
मुंबई संघाचा पुढील सामना शनिवारी लखनौ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध होणार आहे. या सामन्यात सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनला संधी मिळू शकते. खुद्द मुंबई फ्रँचायझीने ट्विटद्वारे हे संकेत दिले आहेत.
3 / 5
मुंबई फ्रँचायझीने हॅशटॅगसह अर्जुनचे नाव लिहून ट्विट केले की, लखनौविरुद्धच्या सामन्यासाठी आमच्या डोक्यात प्लॅन बनत आहे. व्हायरल होत असलेल्या या पोस्टवर अर्जुनची बहीण सारा तेंडुलकरनेही कमेंट केली आहे. (PC : Sara Tendulkar Instagram)
4 / 5
मुंबई इंडियन्सच्या या ट्विटवर कमेंट करताना सारा तेंडुलकरने हार्ट इमोजी (10 निळ्या रंगाचे हार्ट) पोस्ट केल्या आहेत. म्हणजेच, अर्जुन तेंडुलकर आयपीएलमध्ये पदार्पण करू शकतो ही गोष्ट जाणून सारालाही खूप आनंद झाला आहे आणि ती आपल्या भावाला खेळताना पाहण्यासाठी उत्सुक आहे. (PC : Mumbai Indians Instagram Screenshot)
5 / 5
22 वर्षीय अर्जुन तेंडुलकर हा डावखुरा मध्यमगती गोलंदाज आहे. त्याने आत्तापर्यंत देशांतर्गत स्पर्धेत मुंबईसाठी फक्त दोन टी-20 सामने खेळले असून त्यात त्याने 2 बळी घेतले आहेत. महा लिलावात मुंबई फ्रँचायझीने अर्जुनला 30 लाख रुपयांच्या बोलीवर विकत घेतले आहे.