KL Rahul : शस्त्रक्रियेनंतर केएल राहुल सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला, “आता मैदानावर…”
आयपीएल 2023 स्पर्धेत आरसीबी विरुद्धच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल दुखापतग्रस्त झाला. क्षेत्ररक्षण करताना त्याला दुखापत झाली. आता त्याच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
1 / 6
लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल आरसीबी विरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दुखापतग्रस्त झाला आणि आयपीएलमधून बाहेर पडला होता. त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. याबाबतची माहिती केएल राहुलने सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहे.
2 / 6
1 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्याच्या दुसऱ्या षटकात राहुल चेंडूचा पाठलाग करत असताना मैदानावर पडला. वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्याला तातडीने मैदानाबाहेर काढण्यात आले.
3 / 6
केएल राहुलने सोशल मीडियावर बातमी शेअर करत सांगितलं की, "सर्वांना नमस्कार, माझी शस्त्रक्रिया यशस्वी झाली. मी आरामात आहे आणि सर्व काही सुरळीत पार पडले. माझ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांचे आणि वैद्यकीय कर्मचार्ऱ्यांचे आभार. मी आता सुखरूप आहे. लवकरच बरा होण्याच्या मार्गावर आहे. मी लवकरच मैदानात परतण्याचा निर्धार केला आहे."
4 / 6
दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडलेल्या केएल राहुल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपलाही मुकला आहे.
5 / 6
केएल राहुलच्या जागी आणखी एक यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन भारतीय संघात सामील झाला आहे. तर कृणाल पांड्याकडे लखनऊ संघाचे नेतृत्व दिलं आहे.
6 / 6
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधून बाहेर असलेला केएल राहुल ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक संघात सामील होणार की नाही हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.