चेन्नई सुपर किंगसचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला गुडघ्यात दुखापत झाली आहे. त्यामुळे धोनीला काही सामन्यांना मुकावं लागण्याची शक्यता आहे.
धोनीला झालेल्या दुखापतीमुळे चेन्नई सुपर किंग्स टीममध्ये चिंतेचं वातावरण आहे. त्यामुळे धोनीला बाहेर बसावं लागलं तर कॅप्टन्सी कोण करणार, असा सवाल उपस्थित होतो.
धोनी बाहेर झाल्यास कर्णधारपदासाठी टीममध्ये 2 प्रबळ दावेदार खेळाडू आहेत. एक म्हणजे स्टार ऑलराउंडर रविंद्र जडेजा तर दुसरा मराठमोळा ऋतुराज गायकवाड.
रविंद्र जडेजा याने या मोसमात आतापर्यंत 4 सामन्यात 29 धावा केल्या आहेत. तर 6 विकेट्स घेतल्या आहेत.
तर ऋतुराज गायकवाड याने 4 मॅचमध्ये 197 धावा केल्या आहेत. ऋतुराज सातत्याने धावा करतोय.