चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सवर 5 विकेट्सने विजय मिळवत पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. चेन्नईच्या प्रत्येक खेळाडूने इथपर्यंतच्या प्रवासात निर्णायक आणि मोलाची भूमिका बजावली.
चेन्नईच्या या नेत्रदिपक कामगिरीत मराठमोळ्या अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड आणि तुषार देशपांडे यांचाही तितकंच योगदान राहिलंय.
अजिंक्य रहाणे आयपीएल 2023 आऊट ऑफ फॉर्म होता. रहाणेची कुठेच काही चर्चा नव्हती. मात्र चेन्नईने त्याच्यावर विश्वास दाखवला. रहाणेने तो विश्वास सार्थ ठरवला. रहाणेने या हंगामातील 14 सामन्यांपैकी 11 डावात बॅटिंग करताना 326 धावा केल्या. रहाणेने जवळपास 175 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश आहे.
हा महामुकाबला पाहण्यासाठी रहाणेची पत्नी राधिका आणि लेक आर्या उपस्थित होत्या. चेन्नई जिंकल्यानंतर रहाणेने आपल्या त्रिकोणी कुटुंबासोबत ट्रॉफीसह फोटो काढला.
ऋतुराज गायकवाड याने आयपीएल 16 व्या मोसमात 16 सामन्यातील 15 डावांमध्ये 4 अर्धशतकांसह 590 धावा केल्या. ऋतुराजने काही डावांचा अपवाद वगळता या हंगामात सातत्याने चमकदार कामगिरी केली आहे.
ऋतुराजनेही चेन्नईच्या विजयानंतर ट्रॉफीसोबत फोटो काढला. ऋतुराज लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे.
तुषार देशपांडे या 16 व्या मोसमात खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला. तुषार या हंगामात चेन्नईकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला.
तुषारने 16 सामन्यांमध्ये 21 विकेट्स घेत आपली छाप सोडली.