IPL 2023 : दिनेश कार्तिकचा अंडर 16 खेळाडूंना मोलाचा सल्ला, पण झालं असं की…
आयपीएल 2023 स्पर्धेत दिनेश कार्तिककडून हवी तशी फलंदाजी होताना दिसत नाही. त्यामुळे त्याच्या फॅन्सनी नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे त्याला ट्रोलर्सने वेगळ्याच कारणासाठी ट्रोल केलं आहे.
1 / 6
आयपीएल 2023 स्पर्धेत दिनेश कार्तिकचे स्टार काही चालताना दिसत नाहीत. आतापर्यंत खेळलेल्या 8 सामन्यात फक्त 83 धावा केल्या आहेत.
2 / 6
राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आयोजित केलेल्या 16 वर्षाखालील खेळाडूंच्या शिबिरात आरसीबीचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने हजेरी लावली.
3 / 6
या शिबिरात दिनेश कार्तिकनं उपस्थित तरुणांसोबत संवाद साधला. आपली स्वप्न गाठण्यासाठी मौल्यवान सल्ला आणि काही महत्त्वपूर्ण माहिती दिली.
4 / 6
या संवादाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दिनेश कार्तिकला ट्रोल करण्यात येत आहे.
5 / 6
कारण आयपीएल 2023 मध्ये दिनेश कार्तिकची फलंदाजी हवी तशी झालेली नाही. फिनिशर म्हणून ख्याती असलेला दिनेश कार्तिक 11.86 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
6 / 6
ट्रोलर्सने ट्रोल केल्यानंतर लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात दिनेश कार्तिक बॅटने उत्तर देतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.