IPL 2023 : प्लेऑफ आणि अंतिम फेरीत मिळून इतके चेंडू निर्धाव, बीसीसीआय लावणार इतकी झाडं
आयपीएल 2023 स्पर्धेत बीसीसीआयने प्लेऑफ आणि अंतिम फेरीत जितके डॉट बॉल टाकले जातील त्यानुसार झाडं लावण्याचा निर्धार केला होता. एका डॉट बॉलसाठी 500 झाडं असं गणित ठरलं आहे. चला तर जाणून घेऊयात किती झाडं लावावी लागणार ते..
1 / 7
बीसीसीआयने या आयपीएल प्लेऑफ सामन्यापूर्वी एक नवीन मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून, बीसीसीआयने जाहीर केले की, प्लेऑफ सामन्यांमध्ये टाकलेल्या प्रत्येक डॉट बॉलसाठी, टाटा कंपनीसोबत भागीदारीत 500 रोपे लावली जातील.
2 / 7
यामुळे प्लेऑफ दरम्यान डॉट बॉलच्या जागी ग्रीन ट्री इमेज ग्राफिक वापरण्यात आले होते. आता आयपीएलचा 16वा हंगाम संपला असून प्लेऑफच्या टप्प्यात खेळल्या गेलेल्या सर्व चार सामन्यांमध्ये किती डॉट बॉल खेळले गेले याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
3 / 7
गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील पहिल्या क्वालिफायर सामन्यात दोन्ही संघांच्या गोलंदाजांनी 40 षटकात एकूण 84 डॉट बॉल टाकले होते.
4 / 7
लखनऊ सुपरजायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील एलिमिनेटर सामन्यात दोन्ही संघांच्या गोलंदाजांनी टाकलेल्या डॉट बॉलची एकूण संख्या 96 इतकी नोंदवली गेली.
5 / 7
मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात फक्त 67 डॉट बॉल झाले.
6 / 7
चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील अंतिम सामन्यात एकूण डॉट बॉल संख्या 45 इतकी नोंदवली गेली. म्हणजे 4 सामन्यांतून एकूण 292 डॉट बॉल टाकले गेले.
7 / 7
बीसीसीआय 292 x 500 गणनेनुसार टाटा यांच्या सहकार्याने एकूण 1 लाख 46 हजार रोपे लावणार आहे. याद्वारे आयपीएलने ग्रीन डॉट मोहिमेत हरित क्रांती घडवून आणणार आहे.