IPL 2023 : महागड्या खेळाडूंनी संघाचं केलं वाटोळं ! फलंदाजी आणि गोलंदाजीत पूर्ण फेल
आयपीएल 2023 स्पर्धेत फ्रेंचाईसीने विदेशी खेळाडूंना आपल्या संघात सहभागी करण्यासाठी मोठी रक्कम मोजली खरी पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. वाचा कोण आहेत हे खेळाडू
1 / 6
आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पण ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी फ्रेंचाईसीनी आपल्या संघात चांगले खेळाडू सहभागी करण्यासाठी मोठी बोली लावली. मात्र विदेशी खेळाडू संघासाठी त्रासदायक ठरले. (IPL Photo)
2 / 6
सॅम करनला पंजाब किंग्सने 18.5 कोटी खर्च करून खरेदी केलं. आयपीएल लिलावाचे सर्व नियम मोडीत काढले होते. पण हा खेळाडू काही खास करू शकला नाही. या पर्वातील 14 सामनयात 276 धावा केल्या आणि फक्त 10 विकेट्स घेतल्या. पंजाबचा संघ प्लेऑफमध्येही पोहोचला नाही. (IPL Photo)
3 / 6
बेन स्टोक्सलाही चेन्नई सुपर किंग्सने 16.25 कोटी खर्च करून संघात घेतलं होतं. पण हा खेळाडू स्पर्धा मध्येच सोडून मायदेशी परतला. स्टोक्स फक्त दोन सामने खेळला. त्यात त्याने 15 धावा केल्या. तसेच एकही विकेट घेता आली नाही. (IPL Photo)
4 / 6
वानिंदु हसारंगाला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आपल्या संघात सहभागी केलं होतं. त्याच्याकडून संघाला फार अपेक्षा होत्या. मात्र तो काही खास करू शकला नाही. आठ सामन्यात 9 गडी बाद केले आणि 8.13 चा इकॉनोमी रेट होता. (IPL Photo)
5 / 6
इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूकला सनराईजर्स हैदराबादने 13.25 कोटी खर्च करून संघात घेतलं. हा खेळाडूही आयपीएलमध्ये अपयशी ठरला. एकच शतक ठोकलं आणि इतर सामन्यात सुमार कामगिरी राहिली. 11 सामन्यात त्याने एकूण 190 धावा केल्या. (IPL Photo)
6 / 6
जोफ्रा आर्चरला मुंबई इंडियन्सने 8 कोटी खर्च करून संघात घेतलं होतं. पण जखमी असल्याने मागच्या पर्वात खेळू शकला नाही. तसेच या सिझनमध्येही काही खास करू शकला नाही. पाच सामन्यात त्याने फक्त दोन विकेट्स घेतल्या. (IPL Photo)