IPL Playoff 2023 : प्लेऑफच्या शर्यतीत पाच संघ आमनेसामने! मग कसं ठरणार प्लेऑफचं गणित? जाणून घ्या

| Updated on: May 17, 2023 | 5:02 PM

IPL 2023 : चेन्नई, मुंबई आणि लखनऊ संघ पुढील सामने जिंकले तरच प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतात. परंतु येथे चौथ्या स्थानावर असलेल्या संघासह पंजाब किंग्ज आणि आरसीबीला निव्वळ धावगतीने स्पर्धा करण्याची चांगली संधी आहे.

1 / 9
आयपीएल 2023 स्पर्धेची साखळी फेरी अंतिम टप्प्यात आहे. 64 सामने पूर्ण झाले असले तरी केवळ गुजरात टायटन्सनेच प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे. तसेच दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहेत.

2 / 9
उर्वरित तीन स्पॉट्ससाठी अजूनही 7 संघ स्पर्धा करत आहेत. पण केकेआर आणि राजस्थान रॉयल्स संघांना गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघाने 14 गुण मिळवले तरच त्यांना प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळेल. याचा अर्थ मुंबई इंडियन्सने पुढचा सामना जिंकल्यास केकेआर आणि राजस्थान रॉयल्स संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होतील.

3 / 9
गुणतालिकेतील उर्वरित तीन स्थानांसाठी इतर 5 संघांमध्ये थेट स्पर्धा आहे. त्यामुळे सीएसके, मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स संघ आता अडचणीत सापडले आहेत.

4 / 9
चेन्नई, मुंबई आणि लखनऊ संघ पुढील सामने जिंकले तरच प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतात. परंतु चौथ्या स्थानावर असलेल्या संघासह पंजाब किंग्ज आणि आरसीबीला निव्वळ धावगतीने स्पर्धा करण्याची चांगली संधी आहे.

5 / 9
सध्या 15 गुण मिळवणारे सीएसके आणि लखनऊ पुढील सामने जिंकले तरच 17 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश करतील. मुंबई इंडियन्स जिंकल्यास त्यांना 16 गुण मिळू शकतात आणि चौथ्या स्थानावर असेल.

6 / 9
12 गुण असलेल्या आरसीबी आणि पंजाब किंग्जने पुढील 2 सामने जिंकल्यास त्यांना 16 गुणांसह मुंबई इंडियन्सला नेट रनरेटमध्ये मागे टाकण्याची आणि प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे.

7 / 9
लखनऊ सुपर जायंट्स पुढील सामन्यात केकेआर विरुद्ध आणि सीएसके दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पराभूत झाल्यास ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. दोन्ही संघांचे केवळ 15 गुण असल्याने मुंबई इंडियन्स, आरसीबी आणि पंजाब किंग्जला 16 गुणांसह प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याची संधी आहे.

8 / 9
चेन्नई सुपर किंग्ज, लखनऊ सुपर जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात गुणतालिकेत तीन स्थानांसाठी थेट स्पर्धा आहे.

9 / 9
या आठवडय़ात होणाऱ्या या संघांच्या लढतींमध्ये रोमहर्षक लढत पाहायला मिळू शकते. या लढतीत कोण बाजी मारणार? आणि प्लेऑफमध्ये कोणाला स्थान मिळणार? याबाबत उत्सुकता आहे.