IPL 2023 GT vs CSK Final : अंतिम सामन्यात महेंद्रसिंह धोनीच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद, वाचा
IPL 2023 GT vs CSK Final : महेंद्रसिंह धोनीने आयपीएल इतिहासात अनेक विक्रमांची नोंद केली आहे. अंतिम सामन्यात तर विक्रमांची यादीच आहे. चला पाहूयात काय केलेत विक्रम
1 / 6
IPL 2023 Final CSK vs GT: महेंद्रसिंग धोनीने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या IPL अंतिम सामन्यात खेळून अनेक विक्रम केले आहेत.
2 / 6
गुजरात टायटन्सविरुद्धच्या या सामन्यात महेंद्रसिंह धोनी 250 सामने खेळणारा आयपीएलच्या इतिहासातील पहिला खेळाडू ठरला आहे.
3 / 6
धोनी सर्वात जास्त आयपीएल फायनल खेळणारा खेळाडू बनला आहे. धोनी सीएसकेसाठी एकूण 10 फायनल खेळला आहे. त्याने रायझिंग पुणे जायंट्सकडून 1 अंतिम सामनाही खेळला आहे.
4 / 6
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक प्लेऑफचा विक्रमही धोनीच्या नावावर आहे. महेंद्रसिंह धोनीने एकूण 28 प्लेऑफ सामने खेळले आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सुरेश रैनाने 24 प्लेऑफ सामने खेळले आहेत.
5 / 6
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक फायनल खेळणारा कर्णधार होण्याचा विक्रमही धोनीच्या नावावर आहे. एमएसडीने 10 वेळा अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्व केले आहे.
6 / 6
चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरात टायटन्स संघाने निर्धारित 20 षटकांत 4 गडी गमावून 214 धावा केल्या.