GT vs CSK, Weather Update : गुजरात विरुद्ध चेन्नई क्वॉलिफायर सामना पावसामुळे झाला नाही तर…! काय आहे नियम जाणून घ्या
GT vs CSK IPL 2023 Qualifier 1 : गुजरात विरुद्ध चेन्नई सामन्यात पावसाची शक्यता नाही. तरीही पाऊस झाल्यास सामन्याचा निकाल कसा लागणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे? चला जाणून घेऊयात
1 / 6
आयपीएल 2023 स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स या संघांनी धडक मारली आहे. (Photo : BCCI/IPL)
2 / 6
आयपीएल स्पर्धेतील पहिला क्वॉलिफायर सामना आज चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमर खेळला जाणार आहे. महेंद्रसिंह धोनीचा चेन्नई संघ आणि हार्दिक पांड्याचा गुजरात संघ आमनेसामने असणार आहेत. (Photo : BCCI/IPL)
3 / 6
सामन्यातील विजयी संघाची वर्णी थेट अंतिम फेरीत लागणार आहे. तर पराभूत संघाचा सामना मुंबई विरुद्ध लखनऊ या विजेत्या संघाशी होईल. पण पहिल्या सामन्यात पाऊस पडला तर निकाल कसा लागणार? जाणून घ्या (Photo : BCCI/IPL)
4 / 6
चेन्नई विरुद्ध गुजरात सामन्यात पावसाची शक्यता नाही. पण पाऊस झाला तर निकाल सुपर ओव्हरने दिला जाईल. प्लेऑफ आणि फायनल सामन्यासाठीही हाच नियम असेल. (Photo : BCCI/IPL)
5 / 6
पावसामुळे सुपर ओव्हर खेळता आली नाही तर लीग पॉइंट्सच्या आधारे विजेता ठरवला जाईल. सर्व प्लेऑफ सामन्यांसाठी हा नियम असेल. क्वॉलिफायर 1, एलिमिनेटर आणि क्वॉलिफायर 2 सामन्यासाठी राखीव दिवस नाही.(Photo : BCCI/IPL)
6 / 6
म्हणजेच आजच्या गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्यात पाऊस झाला तर सुपर ओव्हरने निकाल दिला जाईल. सुपर ओव्हरही खेळता आली नाहीत तर गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या गुजरातला अंतिम फेरीत प्रवेश मिळेल. (Photo : BCCI/IPL)