IPL 2023 : आरसीबी संघातील निवडीबाबत केदार जाधवने केला खुलासा, म्हणाला…
IPL 2023 : आयपीएल स्पर्धेत केदार जाधवने आतापर्यंत एकूण 93 सामने खेळले आहेत. यात त्याने 1196 धावा केल्या आहे. तर अर्धशतकं झळकावली आहेत. पण आता समालोचन करत असताना त्याला आरसीबीने संघात घेतलं आहे.
1 / 7
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात केदार जाधवची सरप्राईज एंट्री झाली आहे. समालोचन करणाऱ्या केदार जाधवला संघात कसं स्थान मिळालं असा प्रश्न अनेकांना पडला होता.
2 / 7
आरसीबीकडून खेळणारा डेव्हिड विली दुखापतग्रस्त झाल्याने स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी केदार जाधवला संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे निवड होण्यापूर्वी केदार जाधव जिओ सिनेमावर मराठीत समालोचन करत होता.
3 / 7
आरसीबी संघात थेट स्थान मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत असताना खुद्द केदार जाधवने याबाबत सांगितलं आहे. संघात कशी निवड झाली याबाबत खुलासा केला आहे.
4 / 7
समालोचन करत असताना आरसीबीचे प्रशिक्षक संजय बांगर यांचा फोन आला. त्यांनी माझ्या फिटनेस आणि सरावाची चौकशी केली होती. त्यामुळे मला संघात स्थान मिळेल हे आधी माहिती होते.
5 / 7
आरसीबी संघात निवड झाल्याने केदार जाधवने आनंद व्यक्त केला आहे. संघात मला घेतल्याने मी सर्व खेळाडू आणि फ्रेंचाईसीचे आभार मानतो.मी संघासाठी माझं सर्वस्व पणाला लावून कामगिरी करेन.
6 / 7
केदार जाधव शेवटची आयपीएल स्पर्धा 2021 मध्ये खेळला होता. सनरायजर्स हैदराबादकडून खेळताना त्याने 6 सामन्यात फक्त 55 धावा केल्या. 2016 आणि 2017 मध्ये आरसीबीसाठी 17 सामने खेळला. यात त्याने 23.92 च्या सरासरीने 311 धावा केल्या.
7 / 7
केदार जाधव आतापर्यंत आयपीएलमध्ये 93 सामने खेळला आहे. यात त्याने 1196 धावा केल्या आहेत. तसेच 4 अर्धशतकं झळकावली आहेत. आरसीबीने 38 वर्षीय केदार जाधवची निवड केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.