लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल याने पंजाब किंग्स विरुद्ध आयपीएलच्या 16 व्या मोसमातील वैयक्तिक पहिलंवहिलं अर्धशतक ठोकलं.
केएलने 56 बॉलमध्ये 8 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने 74 धावांची खेळी केली. केएल राहुल याने या खेळीसह आयपीएलमध्ये वेगवान 4 हजार धावा करण्याचा विक्रम केला.
केएलने या खेळीसह युनिव्हर्स बॉल ख्रिस गेल याचा रेकॉर्ड ब्रेक केला. केएलने गेलच्या तुलनेत 7 डावांआधी 4 हजार धावा पूर्ण केल्या. केएलने 105 डावांमध्ये 4 हजार धावांचा टप्पा पार केला.
तर ख्रिस गेल याने 112 डावांमध्ये वेगवान 4 हजार धावा करण्याची कामगिरी केली होती.