IPL 2023 : कोलकाता विरुद्धच्या सामन्यात लखनऊ वापरणार अशी आयडिया, ईडन गार्डन्सवर मिळणार सपोर्ट

| Updated on: May 16, 2023 | 3:06 PM

IPL 2023 : आयपीएल साखळी फेरीतील लखनऊ सुपर जायंट्सचा शेवटचा सामना कोलकाता नाइट राईडर्स विरुद्ध होणार आहे. 20 मे रोजी ईडन गार्डनवर हा सामना होणार आहे. त्यामुळे कोलकात्याला सपोर्ट मिळणार हे निश्चित आहे. यासाठी लखनऊने जबरदस्त स्ट्रॅटर्जी आखली आहे.

1 / 6
आयपीएलच्या 68 व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स आमनेसामने असतील.केकेआरच्या घरच्या मैदानावर हा सामना होत असल्याने प्रेक्षकांचा त्यांना पाठिंबा मिळेल.

2 / 6
केकेआरला प्रेक्षकांचा पाठिंबा मिळेल हे जाणून लखनऊ सुपर जायंट्स संघाचे मालक संजीव गोयंका यांनी मास्टरस्ट्रोक मारण्याचा निर्णय घेतला आहे. लखनऊ संघाने जर्सी बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लखनऊ संघाला ईडन गार्डन्स मैदानावर कोलकात्यापेक्षा अधिक पाठिंबा मिळेल.

3 / 6
पश्‍चिम बंगालच्या लोकांना क्रिकेटइतकेच फुटबॉल आवडते. विशेषतः बंगालचा प्रसिद्ध फुटबॉल क्लब एटीके मोहन बागानचे खूप चाहते आहेत. त्यामुळे या संघाची जर्सी लखनऊ सुपर जायंट्स परिधान करणार आहे.

4 / 6
मोहन बागान क्लबचे मालक संजीव गोयंका आहेत. गोयंका यांच्याकडे इंडियन सुपर लीग (फुटबॉल) आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये संघ आहेत. त्यांनी कोलकाता चाहत्यांची मने जिंकण्याची योजना आखली आहे.

5 / 6
केकेआरविरुद्धच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा खेळाडू मोहन बागान संघाच्या रंगीत जर्सीमध्ये खेळणार आहे. सध्याच्या गडद निळ्या जर्सीऐवजी, एलएसजी हिरव्या आणि मरून जर्सीमध्ये ईडन गार्डन्सवर दिसेल.

6 / 6
संजीव गोयंका यांनी याद्वारे मोहन बागानच्या चाहत्यांना लखनऊ सुपर जायंट्सकडे आकर्षित करण्याची योजना आखली आहे.