MI vs GT IPL 2023 : राशिद खानच्या फिरकीची जादू, मुंबईला धक्का देत असं पटकावलं अव्वल स्थान

| Updated on: May 12, 2023 | 9:04 PM

IPL 2023 स्पर्धेत मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात फिरकीपटू राशीद खानच्या गोलंदाजीची जादू दिसली. आपल्या फिरकीच्या जोरावर त्याने गोलंदाजांना नाचवलं.

1 / 6
गुजरातने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईने मोठी धावसंख्या उभारण्याच्या दृष्टीने रोहित आणि इशान या जोडीने सावध सुरुवात केली. ही जोडी जमल्याने गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्यानं आपल्या भात्यातील फिरकीचं अस्त्र काढलं. चेंडू राशिद खानकडे सोपवला. (Photo : IPL/BCCI)

2 / 6
संघाचं पाचवं षटक हार्दिक पांड्याने राशिद खानकडे सोपवलं. पहिल्या षटकात काही खास करू शकला नाही. 0,1,0,4,2,0 अशा धावा आल्या. (Photo : IPL/BCCI)

3 / 6
राशिद खाननं दुसऱ्या षटकापासून आपल्या गोलंदाजीची धार दाखवली. पहिल्याच चेंडूवर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला तंबूचा रस्ता दाखवला. तसेच याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर इशान किशनला बाद केलं. (Photo : IPL/BCCI)

4 / 6
मुंबई दबावात असल्याचं पाहून हार्दिक पांड्याने नववं षटक पुन्हा राशिद खानला सोपवलं. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर नेहल वढेराला तंबूचा रस्ता दाखवला. (Photo : IPL/BCCI)

5 / 6
मुंबई इंडियन्सचे चार गडी बाद करत राशिद खानने पर्पल कॅप आपल्या नावावर केली आहे. राशीद खानच्या नावावर आता 23 विकेट्स आहे. (Photo : IPL/BCCI)

6 / 6
राशिद खानने 4 षटकात 30 धावा देत 4 गडी बाद केले.  (Photo : IPL/BCCI)