MI vs RCB | मुंबई विरुद्ध आरसीबी हायव्होल्टेज मॅचमध्ये हे 6 बॅट्समन ठरवणार कोण जिंकणार ते?

| Updated on: May 09, 2023 | 12:11 AM

MI vs RCB | मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्सं बगंळुरुच्या ताफ्यात प्रत्येकी 3 असे एकूण 6 विस्फोटक फलंदाज आहेत, जे सामना एकहाती पालटण्याची क्षमता ठेवतात. त्यामुळे या 6 जणांच्या कामिगरीकडे क्रिकेट जगताचं लक्ष असणार आहे.

1 / 7
आयपीएल 16 व्या मोसमात मंगळवारी 9 मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात रंगतदार लढत होणार आहे. या सामन्यात दोन्ही टीमकडून एकूण 6 खेळाडू हे मॅचविनिंग भूमिका बजावू शकतात. या खेळाडूंनी आतापर्यंत अनेकदा एकहाती मॅच जिंकून दिली आहे. त्यामुळे या 6 फलंदाजांच्या कामगिरीकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

2 / 7
फाफ डु प्लेसिस या मोसमात सुरुवातीपासून धमाकेदार कामगिरी करतोय. फाफकडे सुरुवातीपासून काही दिवसांचा अपवाद वगळता ऑरेन्ज कॅप आपल्याकडे ठेवलीय. त्यामुळे मुंबईच्या गोलंदाजांसमोर फाफला रोखण्याचं आव्हान असणार आहे.

3 / 7
विराट कोहली हा पण सुरुवातीपासून काही सामन्यांचा अपवाद वगळता सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करतोय. विराटने नुकतेच 7 हजार धावा पूर्ण केल्यात.

4 / 7
ग्लेन मॅक्सवेल हा ऑलराउंडर आहे. तो बॅटिंग आणि बॉलिंगने धमाकेदार कामगिरी करतो. मात्र त्याला या मोसमात आतापर्यंत आपला रंग हवा तसा  दाखवता आलेला नाही. फाफ, विराट आणि मॅक्सवेल हे तिघेही विस्फोटक फलंदाज आहेत. त्यामुळे या तिघांपैकी एकही बॅट्समन जरी टिकून राहिला तर मुंबईचा पराभव निश्चित आहे.

5 / 7
आता मुंबईकडे वळुयात. सूर्यकुमार यादव याला गेल्या 3 सामन्यांमध्ये सूर गवसलाय. त्यामुळे आता आरसीबी विरुद्ध सूर्या हा फॉर्म कायम ठेवणार का, याकडे पलटणचं लक्ष असेल.

6 / 7
रोहित शर्मा हा या सिजनमध्ये सपशेल अपयशी ठरलाय.  या मोसमात रोहित 2 वेळा झिरोवर आऊट झाला. त्याला आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मात्र रोहितला कमबॅकसाठी एक मॅच पुरेशी आहे. यामुळे आरसीबी विरुद्ध रोहितच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे.

7 / 7
इशान किशन याने आतापर्यंत मुंबईला अनेकदा तारलं. इशानलाही गेल्या काही सामन्यांपासूनच सूर गवसलेला आहे. इशानने शानदार खेळी केली आहे. यामुळे इशानकडून खूप दिवसांनी झंझावाती आणि मोठी खेळी पाहायला मिळेल, अशी आशा पलटणला आहे.