आयपीएल 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सला पराभूत करत जेतेपदावर नाव कोरलं.
संपूर्ण हंगामात फलंदाजीतून चमकदार कामगिरी करणाऱ्या शुभमन गिलने ऑरेंज कॅप मिळवली. तर, गोलंदाजीत 27 बळी घेणाऱ्या मोहम्मद शमीला पर्पल कॅप मिळाली.
आयपीएल मोसमात शानदार फलंदाजी करणाऱ्या खेळाडूला देण्यात टाटा कार (किंवा 10 लाख रुपये) देण्याचं जाहीर केलं होतं. टाटा कंपनीने ही गाडी सर्वाधिक स्ट्राइक रेट असलेल्या खेळाडूला देण्याचं जाहीर केलं होतं.
सुपर स्ट्रायकरसाठी घोषित केलेली टाटा टियागो ईव्ही कार आरसीबीचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलला मिळाली आहे.
आरसीबीसाठी मधल्या फळीत फलंदाजी करणाऱ्या मॅक्सवेलने यावेळी 14 डावात 400 धावा केल्या. तेही 183.48 च्या स्ट्राइक रेटने.
ग्लेन मॅक्सवेल या मोसमातील सुपर स्ट्रायकर म्हणून उदयास आला आहे. त्यानुसार टाटा टियागो इलेक्ट्रिक कार आरसीबीच्या अष्टपैलू खेळाडूला देण्यात आली आहे.