Virat Kohli | मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग कोहली याचा ‘विराट’ कारनामा
आयपीएलच्या 16 व्या मोसमातील 5 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्सनवर 8 विकेट्सने शानदार विजय मिळवला. विराट कोहली याने या सामन्यात 82 धावांची नाबाद खेळी करत आरसीबीला विजय मिळवून दिला. विराटने या खेळीसह अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.
1 / 6
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा आक्रमक फलंदाज विराट कोहली याने मुंबई इंडियन्स विरुद्धच्या पहिल्या सामन्यात 82 धावांच्या नाबाद खेळीसह अनेक विक्रम केले.
2 / 6
विराट कोहली याने चिन्नास्वामी मैदानात अर्धशतक झळकावलं. विराट यासह एकाच स्टेडियममध्ये सर्वाधिक अर्धशतकं ठोकणारा फलंदाज ठरला.
3 / 6
विराट या अर्धशतकासह आयपीएलमध्ये सर्वाधिक हाफ सेंच्युरी ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. विराटने आतापर्यंत आयपीएलमध्ये 49 अर्धशतकं ठोकली आहेत.
4 / 6
तसेच विराट आयपीएलमध्ये 80 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा भारतीय फलंदाज आहे. विराटने एकूण 13 वेळा 80 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. तर शिखर धवन याने 10 वेळा 80 पेक्षा जास्त धावा केल्यात.
5 / 6
विराट आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतकी भागीदारी करणारा फलंदाजही ठरला आहे. विराट याने एकूण 95 पेक्षा जास्त वेळा अर्धशतकी भागादारी केली आहे. धवनने 94 वेळा आपल्या सहकारी फलंदाजांसोबत अर्धशतकी पार्टनरशीप केली आहे.
6 / 6
विराट एका टी 20 सामन्यात जोफ्रा आर्चर विरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत. विराटने रविवारी 2 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात आर्चर विरुद्ध 17 बॉलमध्ये 28 धावा केल्या. याआधी हा विक्रम केएल राहुल याच्या नावावर होता. राहुलने जोफ्रा विरुद्ध 14 बॉलमध्ये 27 धावा केल्या.