IPL 2023 | फजलहक फारुकी याचा धमाका, जॉस बटलरच्या डोळ्यादेखत दांडी गुल
आयपीएलच्या 16 व्या मोसमातील चौथा सामना हा सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात हैदराबादचा वेगवान गोलंदाज फजलहक फारुकी याने 2 विकेट्स घेत शानदार कामगिरी केली.
1 / 5
आयपीएल 2023 राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज फजलहक फारुकी याने आपली छाप सोडली आहे. फजलहकने या मोसमातील पहिल्याच सामन्यात 2 विकेट्स घेतल्या. फारुकीचं हे कमबॅक खास ठरलंय. कारण फजलहकच्या खेळण्याबाबत संशय होता.
2 / 5
फजलहकला गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीग टी-20 स्पर्धेतून परत पाठवलं होतं. सिडनी थंडर टीमने ऐन स्पर्धेदरम्यान करारमुक्त केलं होतं. एका कथित प्रकरणात फजलहकची वागणूकीचं कारण देत त्याला करारमुक्त करण्यात आलं होतं. नक्की काय घडलं होतं हे स्पष्ट झालं नाही. मात्र फजलहक तेव्हा ऑस्ट्रेलियातून परतला होता.
3 / 5
त्या वादामुळेच सनरायझर्स हैदराबादही आयपीएलमध्ये फजलहकला खेळवणार नसल्याचं म्हटलं जात होतं. मात्र तसं झालं नाही. हैदराबादने फजलहकला आपल्या ताफ्यात कायम ठेवलं.
4 / 5
फजलहकने राजस्थान विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात दमदार कामगिरी केली. फजलहक याने आधी जॉस बटलर याला क्लिन बोल्ड केलं. त्यानंतर यशस्वी जयस्वाल याचा काटा काढला. फजलहकने 4 ओव्हरमध्ये 42 रन्सच्या मोबदल्यात 2 विकेट्स घेतल्या.
5 / 5
फजलहक याला गेल्या काही दिवसात अनेक चढउतार पाहावे लागले. फजलहकला आधी डिसेंबर 2022 मध्ये बीबीएल स्पर्धेतून काढण्यात आलं. मात्र जानेवारी 2023 मध्ये अफगाणिस्तानकडून पदार्पण केलं. त्यानंतर पाकिस्तान सुपर लीगमध्येही आपली छाप सोडली.