IPL 2023 : आरसीबी संघातून या तीन जणांना मिळणार डच्चू ! पाहा कोण कोण आहे यादीत
IPL 2023 : आयपीएल 2023 स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यानंतर आता टीम मॅनेजमेंटने संघाची बांधणीबाबत विचार करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर संघातून तीन जणांना डच्चू मिळणार हे जवळपास निश्चित झालं आहे.
1 / 8
आयपीएलच्या 16 व्या पर्वात आरसीबी संघ अपेक्षेप्रमाणे कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. साखळी फेरीतून संघाचं आव्हान संपुष्टात आलं आहे. विशेषत: संपूर्ण स्पर्धेत आरसीबी संघ चार खेळाडूंवर विसंबून होता. त्यांच्या जोरावर संघाने 7 सामने जिंकले.
2 / 8
फाफ डुप्लेसिस, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज यांनी यावेळी आरसीबीसाठी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. डुप्लेसिसने 730 तर विराट कोहलीने 639 धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेलने 400 धावा केल्या तर सिराजने 19 विकेट्स घेतल्या.
3 / 8
फाफ, कोहली आणि मॅक्सवेल व्यतिरिक्त आरसीबीच्या एकाही फलंदाजाने 14 सामन्यात एकूण 150 धावा केल्या नाहीत. सिराजशिवाय कोणत्याही गोलंदाजाने 15 विकेटही घेतलेल्या नाहीत.
4 / 8
संघ म्हणून कामगिरी करण्यात आरसीबी पूर्णपणे अपयशी ठरला आहे. त्यामुळेच पुढील हंगामापूर्वी आरसीबी संघावर मोठी उलथापालथ होणार हे निश्चित आहे. त्यामुळे पुढील हंगामापूर्वी तीन जणांना आरसीबी संघातून डच्चू मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
5 / 8
आरसीबी संघाचा यष्टिरक्षक असलेल्या अनुज रावतने एकूण 7 सामन्यात फलंदाजी केली. त्याने फक्त 91 धावा झाल्या. म्हणजे 3.4 कोटी रुपये खर्च करून घेतलेल्या खेळाडूच्या धावांची सरासरी फक्त 13 धावा होती. त्यामुळे त्याला रिलीज केलं जाऊ शकतं.
6 / 8
महिपाल लोमरारने या आयपीएलमध्ये 10 डावात फलंदाजी केली. यावेळी एकूण 135 धावा झाल्या. 95 लाख रु. देऊन संघात घेतले होते. पण त्यानेही अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. त्यामुळे लोमरारही डच्चू मिळण्याची दाट शक्यता आहे.
7 / 8
आरसीबी संघाचा फिनिशर म्हणून ख्याती असलेला दिनेश कार्तिकने यावेळी 13 डावात फलंदाजी केली. यावेळी तो 4 वेळा शून्यावर बाद झाला. त्याने फक्त 140 धावा केल्या. त्याला साडेपाच कोटी रुपये देऊन संघात घेतलं होतं. त्याने 13 सामन्यात 10 च्या सरासरीने धावा केल्या.
8 / 8
दिनेश कार्तिक सध्या 37 वर्षांचा असून तो इतर कोणत्याही स्पर्धेत भाग घेत नाहीये. यावेळी तो विकेटकीपिंगमध्येही अपयशी ठरला. त्यामुळे त्यालाही डच्चू मिळणार आहे.